शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या कासारवडवलीत कोयत्याने वार करून कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:41 IST

बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करणा-या गोविंद नामक एका कामगारावर सोमवारी (६ मे ) पहाटेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खून केल्याची घटना घडली. हत्येनंतर मारेक-याने तिथून पलायन केले असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देआरडाओरडा केल्यानंतरही केले सपासप वारकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमारेकऱ्याचा शोध सुरु

ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील रेडीमिक्स काँक्रिट प्लान्टच्याजवळील कच्च्या रस्त्यावर अंदाजे ३५ वर्षीय गोविंद या कामगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटच्या आतील बाजूस असलेल्या या कंटेनरच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर एका अनोळखीने गोविंद या कामगाराला कॉलर धरून ६ मे रोजी पहाटे ३.४५ ते ४ वा. च्या सुमारास ओढत आणले. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर त्याने गोविंदच्या मानेवर लोखंडी कोयत्याने घाव घातला. गंभीर जखमी झाल्यानंतर तो विव्हळत असतांना त्याला पुन्हा काही अंतर त्याने ओढत नेले. नंतर त्याला खाली पाडून त्याच्या मानेवर, डोक्यावर, गालावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार केले. यात गंभीर जखमी होऊन मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या एका सुरक्षारक्षकाने पाहिला. त्याने तातडीने याबाबतची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. सुरुवातीला त्याची कोणतीच ओळख न पटल्याने त्याचे नावही समजले नव्हते. वडवली गावातील काही मजुरांनी त्याचे नाव गोविंदा असून तो बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम (गवंडी) करतो, इतकी माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ आदींनी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे अन्वेषण विभागाचे वागळे इस्टेट युनिट तसेच कासारवडवली पोलीस ठाण्याचे शोध पथक या खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून