शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती रुग्णालयात नो केस पेपर व रांगा, महापालिका अंटेलिया येथील रुग्णालयावर मध्यवर्ती रुग्णालयाचा दावा? 

By सदानंद नाईक | Updated: September 8, 2023 15:20 IST

Ulhasnagar: मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेडसांड होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केस पेपर थेट संबंधित डॉक्टरकडे उपलब्ध करून दिला.

- सदानंद नाईक उल्हासनगर - मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेडसांड होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केस पेपर थेट संबंधित डॉक्टरकडे उपलब्ध करून दिला. यामुळे रुग्णांचा रांगेचा त्रास वाचून त्यांची हेडसांड थांबल्याचे चित्र रुग्णालयात आहे.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय रुग्णांनी ओव्हरफलो झाले असतांना, आलेल्या रुग्णांना सेवा देता याव्या म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य विभागाने केस पेपर फ्री केल्याने, रुग्णांना केस पेपरसाठी रांगा लावण्याची गरज नाही. संबंधित डॉक्टरांच्या कॅबिन समोर उभे राहिल्यास, तेथेच केस पेपर देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. यामुळे आलेल्या रुग्णांचा त्रास वाचून ज्या डॉक्टरांना भेटायचे आहे. त्यांना थेट भेटता येते. तसेच आदी १० रुपयाला मिळणार केश पेपर फ्री केल्याने, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे रुग्णालयात मोफत दिली जातात. एकूणच गोरगरीब व गरजू नागरिकांना रुग्ण सेवा घेण्यात कोणतीच अडचण येत नाही.

महापालिका रुग्णालयावर दावा? मध्यवर्ती रुग्णालयाचे स्ट्रॅक्टरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल काय येतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून रुग्णालयाची दुरुस्ती सुचविल्यास, रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून, महापालिकेचे रिजेन्सी-अंटेलिया येथे बंद अवस्थेत असलेले २०० खाटाचे अद्यावत रुग्णालय वापरण्यासाठी देण्याची मागणी मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी महापालिका आयुक्ताकडे लेखी आहे. महापालिकेने रुग्णालय सुरू करण्यासाठी कोट्यावधीच्या किंमतीतून साहित्य खरेदी केले. मात्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्णालय गेल्या ३ वर्षांपासून बंद असल्याने, रुग्णालयाचे साहित्य भंगारात निघाल्याचे बोलले जाते. कोट्यवधींचे साहित्य भंगारात जाणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापालिका रुग्णालयाचे खाजगीकरण शहरातील डॉक्टर्स, राजकीय नेत्यांचा विरोध डावलून महापालिका रिजेन्सी-अंटेलिया येथील रुग्णालय एका खाजगी रुग्णालयाला चालविण्यासाठी देण्याचा घाट असल्याची टीका होत आहे. ९ लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेने स्वतःचे रुग्णालय बांधल्यानंतर, त्याचे खाजगीकरण करणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलulhasnagarउल्हासनगर