शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान

By सदानंद नाईक | Updated: September 29, 2023 16:15 IST

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली.

उल्हासनगर - मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम या महिलेची कमी दिवसात प्रसूती होऊन ५०० ग्राम वजनाच्या बाळाला जन्म दिला. डॉक्टर व नर्सनी नवजात शिशुकक्षात बाळावर तीन महिने यशस्वी उपचार केल्याने, बुधवारी बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यावेळीं बाळाचे वजन २ किलो व तब्येत सुदृढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. ६ महिन्याची गर्भवती असणाऱ्या ममता निकम हिने उपचारा दरम्यान कमी दिवसाच्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन अवघे ५०० ग्राम असल्याने, बाळाच्या तब्येतीबाबत कुटुंबासह डॉक्टर्स व नर्स यांच्या समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र आईला मुला विषयी असलेले प्रेम व लळा बघून नवजात शिशु कक्षातील डॉक्टर वसंतराव मोरे, डॉ वैशाली पवार, डॉ किरण बनसोडे, डॉ आझम खान, डॉ पूजा यादव, नर्स जयश्री शिंदे, गौरी केलसिकर आदींनी सतत ३ महिने मेहनत घेऊन बाळाला पुनर्जन्म दिला. यादरम्यान बाळाच्या डोळ्याला संसर्ग झाल्याने, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून वर्षाला ६ हजार पेक्षा जास्त बाळांचा जन्म होतो. २०२ बेडची क्षमाता असलेल्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर नवजात शिशु कक्षाची क्षमता १० बालकांची असतांना सरासरी १५ पेक्षा जास्त मुलांवर उपचार होत असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.

असुविधेवर मात मध्यवर्ती रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची क्षमता १० बालकांची असून व्हेंटिलेटरची सुविधा नाही. आदी अपुऱ्या सुविधेवर डॉक्टरांनी मात करून बाळाची तब्येत ठणठणीत करून घरी सुखरूप पाठविले आहे.

आईच्या जिद्दीला सलाम ममता निकम या महिलेची ६ महिण्यात प्रसूती होऊन अवघ्या ५०० ग्राम बाळाला जन्म दिल्याने, कुटुंबानी बाळाच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र आईच्या जिद्दीला डॉक्टर व नर्सनी सलाम ठोकून उपचार केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर