शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पानखंडाला पाणी देण्यास केंद्राची मंजुरी हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:43 IST

तहानलेल्या पाड्यांबाबत ‘लोकमत’ने वृत्ते दिली तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया न देणाऱ्या वन खात्याने ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची लगबग सुरू करताच प्रलंबित न्यायालयीन दाव्याचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यावरील तहानलेल्या आदिवासींना त्यांचे वास्तव्य खासगी वनक्षेत्रात असल्याने मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेमुळे पाणीपुरवठा करता येणार नाही. आदिवासींना पाणी देण्याकरिता येथे काम करायचे, तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असा दावा वन खात्याने केला.

तहानलेल्या पाड्यांबाबत ‘लोकमत’ने वृत्ते दिली तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया न देणाऱ्या वन खात्याने ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची लगबग सुरू करताच प्रलंबित न्यायालयीन दाव्याचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. 

वन विभागाने न्यायालयाच्या आदेशाची कल्पना दिली होती. येथील कोणत्या भागांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे, त्यानुसार काम केले जाईल. ज्या भागांना पाणी देता येणार नाही, त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.- अतुल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका

प्रकरण न्यायप्रविष्ठघोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांवरील पाण्याच्या समस्येला ‘लोकमत’ने वाचा फोडली. येऊरचा वन विभाग येथील कामासाठी परवानगी देत नसल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला. आता वन विभागाने म्हटले आहे की, पानखंडा आदिवासी पाडा हा नियतक्षेत्र ओवळा राखीव वन सर्व्हे क्रमांक २९१ (संपादित खाजगी वन असून, त्यास राखीव वनाचा दर्जा आहे.) या क्षेत्राबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल असून, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

प्रस्ताव अद्याप सादर नाहीवनक्षेत्रातील अतिक्रमणधारकास नव्या सुविधा पुरविल्यास उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांची अवमान होण्याची शक्यता आहे, तसेच कोणतेही वनेतर काम करण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार आमच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात नाही. यासाठी केंद्र शासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाला दिल्याचे येऊर वन विभागाने स्पष्ट केले. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यास त्यांना सांगितल्याचे वन विभागाने सांगितले; परंतु महापालिकेने तसा प्रस्ताव अद्याप तयार करून केंद्राकडे सादर केला नसल्याची माहिती दिली.