शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची स्वच्छ सर्व्हेक्षण समिती डोंबिवलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:12 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत्वाने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कुठेही कचरा दिसून नये यासाठी काळजी घेण्यात आली होती.

ठळक मुद्दे स्थानक पसिररातील फेरीवाले रातोरात गायब जागोजागी डीडीटी पावडर फवारणी

डोंबिवली: स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत्वाने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कुठेही कचरा दिसून नये यासाठी काळजी घेण्यात आली होती.शहरभर ठिकठिकाणी डीडीटी पावडरची फवारणी करण्यात आली होती, त्यामुळे ऐरव्हीपेक्षा जास्त जोमाने स्वच्छता विभाग कामाला लागला होता. एमआयडीसी परिसरासह रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता विभागाच्या कर्मचा-यांसह अधिका-यांनी कंबर कसली होती. विशेष म्हणजे स्थानक परिसरात कुठेही फेरीवाले नव्हते, त्यामुळे आयुक्त वेलरासू यांनी रोजच शहरात राऊंड मारावा अशी चर्चा पालिका वर्तूळासह नागरिकांमध्ये सुरु होती. प्रभाग अधिका-यांमध्येही प्रचंड लगबग होती. महापालिकेच्या उपइमारतीमध्येही आयुक्त येणार असल्याने चैतन्याचे वातावरण होते. शहरभर नागरिकांनी सर्व्हेक्षणात सहभागी व्हावे, आपापली मते नोंदवावी यासाठी सायकलींद्वारे जनजागृती करण्यात आली होती. सर्व्हेक्षण उपक्रमासंदर्भात महापालिकेने आधीपासूनच नागरिकांमध्ये माहिती देणे सुरु केले होते, पण समिती येणार असल्याने जनजागृतीची मोहिम जोरदार राबवण्यात आली होती. महापालिकेच्या या प्रयत्नामुळे जरी स्वच्छतेच्या यादीत काहीसा चढता क्रमांक आला तरी प्रत्यक्षात दिव्याखाली अंधार अशी स्थिती असू नये अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. केंद्राच्या स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या निमित्ताने शहरभर राखण्यात आलेल्या स्वच्छतेचा प्रभाव कायमस्वरुपि असावा, स्वच्छता विभागानेही जशी कंबर आता कसली आहे, त्यात सातत्य ठेवावे अशीही प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली