शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता, महापालिकेचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 17:12 IST

Ulhasnagar : एका वर्षापूर्वी शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत जंगल हॉटेल ते उल्हासनगर स्टेशन दरम्यान रस्ता बांधणीला ५ कोटी निधीला मान्यता देण्यात आली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : मराठा सेक्शन ते स्टेशनकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता शासनाच्या मूलभूत सुखसुविधा योजनेतून बांधण्यात येत असल्याचा प्रताप महापालिका बांधकाम विभागाकडून होत आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असतांना दुसरीकडे सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता बांधण्यात येत असल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शनकडून स्टेशनकडे जाणारा रस्त्याची स्टेशन लगत दुरावस्था झाली होती. 

एका वर्षापूर्वी शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत जंगल हॉटेल ते उल्हासनगर स्टेशन दरम्यान रस्ता बांधणीला ५ कोटी निधीला मान्यता देण्यात आली. त्याच वेळी संपूर्ण रस्ता चांगल्या अवस्थेत असून स्टेशन परिसरात खराब असल्याचा आक्षेप मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी घेतला. अखेर महापालिकेने रस्ता जेथे खराब आहे. त्या ठिकाणी रस्ता नव्याने बांधणार असल्याचे सांगून, रस्त्याचा निधी प्रभागातील इतर विकास कामासाठी वापरण्याचे सांगण्यात आले. अखेर रस्त्याचे काम सुरू झाले असून अरुंद ठिकाणी रस्ता रुंद करण्यात आला. तसेच सुस्थितीत असलेल्या सिमेंट रस्त्यावर नव्याने सिमेंट रस्ता बांधण्यात येत असून रस्ता बांधणीवर सर्वस्तरातून टीका होत आहे. 

महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांच्या सोबत संपर्क झाला नाही. प्रभाग समिती बांधकाम विभागाचे अभियंता अश्विनी आहुजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाच्या मूलभूत योजना निधीतून रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच उर्वरित निधीतुन एलईडी दिवे लावण्यासह रस्त्याच्या नालीचे काम करणार असल्याची माहिती दिली. मात्र चांगल्या अवस्थेतील सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता बांधला जात असल्याने रस्त्याची चर्चा शहरात होत आहे. चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यावर सिमेंट रस्ता न बांधता, रस्त्याचा उर्वरित निधीतून रस्त्यावर दिवे लावणे, नाले बांधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

रस्ता रुंदीकरणांच्या नावाखाली बांधकामे शासनाच्या मूलभूत सुविधा योजने अंतर्गत ५ कोटीच्या निधीतून मराठा सेक्शन विभागातील जंगल हॉटेल ते उल्हासनगर स्टेशन बांधणीला मंजुरी मिळाली. अरुंद ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर रुंदीकरणात बाधित नसलेल्या ठिकाणी बहुमजली बांधकामे सुरू झाली असून अशा अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर