शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

संस्कृतीचे जतन करत श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:26 IST

उत्साह द्विगुणित करण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी

शाम धुमाळ, कसारा: भारतीय संस्कृतीची जोपासना आणि सण-उत्सवातील जिवंतपणा जागृत ठेवण्यासाठी कसाऱ्यातील  श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील  कृष्णजन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्ण जन्माचे स्वागत करण्यासाठी शात्रशुद्ध पद्धतीने रात्री साडेबारा बजता श्री कृष्णाचे पूजन करून  श्री कृष्णाजन्माष्टमी साजरी करण्यात आली.   श्रावण महिन्यात मोट्या प्रमाणात सण-उत्सव साजरे केले जातात. कृष्णजन्माष्टमी श्रावणातील सर्वात मोठा सण आहे. भारतीय सण-परंपरा जोपासण्यासाठी श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कृष्ण जन्माष्टमी उत्सवातील उत्साह द्विगुणित करण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी करून दर्शनासाठी झुंबड जमवली होती. कृष्णाजन्माष्टमी निमित्ताने भजन-कीर्तनाचा सूर मंदिराच्या चारही दिशेने दरवळत होता. श्री कृष्ण जन्माचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी भक्तांची मंदिरात मोठी गर्दी पहावयास मिळत होती. त्या नंतर श्री हनुमान सेवा मंडळा चे अध्यक्ष जयवतं घाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी दहीहंडी उत्सव सुरु करण्यात आला हनुमान सेवा मंडळाच्या गोविंदा पथकाने सकाळी 9 वाजता मानाची हंडी फोडून सुरुवात केली.

श्री हनुमान सेवा मंडळाच्या गोविंदा पथकाने कसारा गावातील 20 हून अधिक हंड्या फोधून परंपरा जपली.दरम्यान श्री हनुमान सेवा मंडळाच्या गोविंदा पथकाचे गेली 30 वर्षा पासून एक वैशिष्ठ आहे 4 ते 6 थर लावून हंडी फोडणाऱ्या हे गोविंदा पथक कोणतीही आर्थिक अपेक्षा  न ठेवता केवळ हिंदू संस्कृती जपण्यासाठी बाळ गोपाळा सह हा उत्सव साजरा करताना मोठ मोठ्या दही हंडी फोडतात.

श्री हनुमान सेवा मंडळं ,देऊळवाडी हे कसारा पंचकोशीतील  एक समाजिक ,धार्मिक,शैक्षिणिक कार्य करणारी समाजिक संस्था आहे आम्ही व आमचे गोविंदा पथक जेव्हा गावातील 20 हून अधिक दही हंडी फोडण्यासाठी टाळ, मृदूगाच्या तालावर जात असते तेव्हा आम्ही कोणा कडून कोणतंही आर्थिक अपेक्षा ठेवत नाही.केवळ हिंदू संस्कृती,परमपरा ,संस्कृती टिकावी यासाठी आम्ही तत्पर असतो.जयवंत घाग, अध्यक्ष, श्री हनुमान सेवा मंडळ, कसारा

 

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी