शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

दिवाळी साजरी करा फक्त वाढीव १६० ग्रॅम साखरेत

By admin | Updated: November 2, 2015 02:01 IST

दिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, साटोरी, शंकरपाळी, पाकातले चिरोटे आठवतात. त्यासाठी रेशनवर वाढवून मिळणारी साखर हा गोरगरीबांचा आधार असतो

पंकज रोडेकर, ठाणेदिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, साटोरी, शंकरपाळी, पाकातले चिरोटे आठवतात. त्यासाठी रेशनवर वाढवून मिळणारी साखर हा गोरगरीबांचा आधार असतो. परंतु यंदा सरकारने रेशनवर दर माणशी फक्त १६० ग्रॅम साखर वाढवून दिल्याने दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न कार्डधारक जनतेला पडला आहे. पूर्वी मिळणाऱ्या खाद्यवस्तू सध्या रेशनिंग दुकानातून जवळपास हद्दपार झाल्या आहेत. तर या व्यतीरिक्त अन्य कोणत्याही चीजा रेशनवर सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिक ांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. तर,ठाणे जिल्हापुरवठा विभागात जिल्ह्यातील (ग्रामीण) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांचा समावेश आहे. शासनाकडून १०० टक्क्यांप्रमाणे ग्रामीण आणि शहरी भागास मंजूर नियतन दर महिन्याला दिले जाते. यामध्ये गहू आणि तांदूळाचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनांतर्गत नियतन दरमहा काढले जाते. दर महिन्यानुसार काढण्यात येणारे नियतन त्या तालुक्यांतील दुकानात पाठवण्यात येते. दिवाळीत ही ती वाढवून दिली आहे. तेल, डाळ आदी वस्तू अद्यापही आलेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. दर महा निघणारे २ हजार ११२ क्विंटल साखरे चे नियतन त्यामुळे या महिन्यात २७८८ क्विंटल झाले. ‘‘शासनाकडून या दिवाळीसाठी फक्त साखर वाढवून आली असून ती प्रति माणशी ५०० ऐवजी ६६० ग्रॅम देण्यात येणार आहे. ती देखील फक्त ग्रामीण भागातील कार्डधारकांना मिळणार आहे. मात्र, तेल, डाळ व अन्य खाद्यवस्तू सध्या तरी उपलब्ध झालेल्या नाही.’’- मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी