शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरण:परराज्यांतील पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:33 IST

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये परराज्यातील काही पोलिसांचाही सहभाग उघडकीस येत आहे

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये परराज्यातील काही पोलिसांचाही सहभाग उघडकीस येत आहे. या आरोपावर शिक्कामोर्तब करणारी माहिती ठाणे पोलिसांना मोबाइल कंपन्यांकडून मिळाली आहे.मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवणाºया टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी जानेवारी महिन्यात केला. या प्रकरणी काही खासगी गुप्तहेरांसह यवतमाळच्या एका पोलीस कर्मचाºयाला पोलिसांनी अटक केली होती. आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २६४ सीडीआर पोलिसांनी हस्तगत केले. हे सीडीआर कुणाला पुरवले, याची माहिती ठाणे पोलिसांनी मोबाइल कंपन्यांकडून मागवली होती. त्यापैकी १६० क्रमांकांची माहिती मोबाइल कंपन्यांच्या नोडल आॅफिसर्सने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार, काही मोबाइल नंबर्सचे सीडीआर मिळवण्यासाठी पोलीस अधिकाºयांचे ई-मेल आयडी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.वेगवेगळ्या राज्यांमधील पोलीस आयुक्तालयांमधून हे सीडीआर मागवण्यात आले होते. पोलीस यंत्रणांकडून तपासकामी वेगवेगळ्या मोबाइल नंबर्सचे सीडीआर मोबाइल कंपन्यांकडून वेळोवेळी मागवले जातात. त्यामुळे हे सीडीआर पोलीस यंत्रणेने तपासकामी मागवले आणि ते संबंधित अधिकाºयांनीच मागवले की नाही, याचीही माहिती ठाणे पोलिसांकडून घेतली जाणार आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये सायबरतज्ज्ञ अजिंक्य नागरगोजे याचाही समावेश आहे. त्याने यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या ई-मेल आयडीचा पासवर्ड चोरून काही सीडीआर मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यामध्ये त्याला यवतमाळचा पोलीस कर्मचारी नितीन खवडे याने मदत केली होती. त्यामुळे पोलिसांनी खवडेलाही अटक केली होती. आता मोबाइल कंपन्यांनी दिलेले १६० सीडीआर काढताना पोलीस अधिकाºयांच्या ई-मेलचा अशाच प्रकारे दुरुपयोग झाला का, हे ठाणे पोलीस तपासून पाहणार आहेत. मोबाइल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सीडीआर पोलीस आयुक्तालयासह ग्रामीण पोलिसांनीही मागवले आहेत. तपासाच्या कार्यकक्षेमध्ये परराज्यांतील पोलिसांचा मुद्दा समोर आल्याने कारवाईची दिशा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर निश्चित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.