शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरण आरोपींच्या अटकेसाठी पाच पथके स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 05:10 IST

बेकायदेशीर मार्गाने सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवून त्याची विक्री करणा-या चार आरोपींचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ठाणे : बेकायदेशीर मार्गाने सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवून त्याची विक्री करणा-या चार आरोपींचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या अटकेसाठी पाच पथके स्थापन करण्यात आली असून ती वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने शुक्रवारी अटक केली. ग्राहकांकडून आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासाकरिता संबंधितांच्या मोबाइल फोनचे सीडीआर काढणे खासगी गुप्तहेरांसाठी अगदी सहज होते, हे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत पंडित यांच्यासह सात खासगी गुप्तहेरांना पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. दिल्लीतील सौरव साहू हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याचा आणि मुंबई येथील त्याच्या तीन हस्तकांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पाच पथके स्थापन केली असून त्यापैकी एक पथक दिल्लीत आहे. मोबाइल कंपन्यांकडून आरोपी सीडीआर नेमका कसा मिळवायचे, ते कुणाकुणाला विकायचे, यासह या प्रकरणाशी संबंधित इतर मुद्यांचा खुलासा साहू याच्या अटकेनंतर होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.>सीडींची पडताळणीआरोपींकडून पोलिसांनी जवळपास एक हजार सीडी हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये खासगी गुप्तहेरांनी हाताळलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधित तपशील आहे. या सीडींमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रफितीदेखील आहेत. ग्राहकाच्या सांगण्यावरून कुणावर पाळत ठेवली असेल, तर त्याच्या चित्रफितीही सीडींमध्ये आहेत. या सीडींची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.ंग्राहकांचीही चौकशीगुप्तहेरांकडून ज्या मोबाइल नंबर्सचे सीडीआर हस्तगत करण्यात आले, त्या मोबाइलधारकांची चौकशी करण्याची तूर्तास गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, लोकांचे सीडीआर काढण्याचे काम गुप्तहेरांना ज्यांनी दिले, त्यांची चौकशी केली जाणार आहे. यातून त्यांचा उद्देश जाणून घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस