शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरण : रजनी पंडितसह सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:47 IST

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध शुक्रवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रामध्ये मुख्यत्वे प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीचा समावेश आहे.

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध शुक्रवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रामध्ये मुख्यत्वे प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीचा समावेश आहे.मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी महिन्यात केला होता. याप्रकरणी देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचे वकील रिझवान सिद्दिकी, एक पोलीस शिपाई आणि काही खासगी गुप्तहेरांसह १२ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.आरोपी प्रशांत पालेकर आणि अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांच्याकडून नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर पोलिसांनी हस्तगत केला होता. त्याच्याशी संबंधित तपासाचा मुद्दा आरोपपत्रामध्ये नमूद केला आहे.संतोष पंडागळे, जसप्रीतसिंग मारवाह, कीर्तेश कवी, अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी आणि पोलीस शिपाई नितीन खवडे या पाच आरोपींचा पहिल्या आरोपपत्रात समावेश नाही. त्यापैकी जसप्रीतसिंग मारवाह याने त्याच्या मोबाइल फोनचे लॉकिंग पॅटर्न पोलिसांना अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे त्याच्या मोबाइल फोनची न्यायवैद्यक तपासणी पोलीस करत आहेत. या आणि तपासाशी संबंधित इतर कारणांमुळे पाच आरोपींना पहिल्या आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. रजनी पंडित, माकेश पांडियन, प्रशांत श्रीपाद पालेकर, जिगर विनोद मकवाना, समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल, प्रशांत अनंत सोनवणे आणि अजिंक्य काशिनाथ नागरगोजे या सात आरोपींची गुन्ह्यातील भूमिका आणि त्यांचा सहभाग आरोपपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी जवळपास २८४ सीडीआर मिळवल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यापैकी १११ सीडीआर एकट्या अजिंक्य नागरगोजेने मिळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.सर्वोच्च न्यायालयात आव्हानअ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांची अटक उच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्यांना कोठडीतून सोडले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याचे आदेशही दिले. या आदेशावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस शनिवारी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. वेळप्रसंगी पोलिसांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे