शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

परवानगीत अडकले सीसीटीव्ही, सिडकोचा पाठपुरावा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:50 IST

सिडको नोडमध्ये २९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यन्वित करण्यात आले आहेत. आणखी २८० ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत आडकाठी करण्यात येत असल्याचा दावा सिडकोकडून करण्यात येत आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळत नसल्याने हा प्रकल्प अर्धवटच राहिलेला आहे.

- अरूणकुमार मेहत्रेकळंबोली : सिडको नोडमध्ये २९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यन्वित करण्यात आले आहेत. आणखी २८० ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत आडकाठी करण्यात येत असल्याचा दावा सिडकोकडून करण्यात येत आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळत नसल्याने हा प्रकल्प अर्धवटच राहिलेला आहे. याबाबत सिडकोचा टेलिकॉम विभाग संबंधित यंत्रणेकडे गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे.नवी मुंबई, पनवेल आणि उरण येथील सुरक्षिततेचा मुद्दा नवीन प्रकल्पांमुळे अतिशय महत्त्वाचा झाला आहे. या व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था राखणे अवघड जात असल्याची वस्तुस्थिती आहे. खारघर ही सायबर सिटी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर शैक्षणिक हब म्हणूनही खारघरचा नावलौकिक वाढत आहे. त्यामुळे साहजिकच या परिसरात वेगवेगळ्या देशांतून आलेले नागरिक राहतात. स्टील मार्केट, एमआयडीसीमुळे उद्योगाचे जाळे पसरले आहे. त्याचबरोबर जेएनपीटी, उरण परिसरातही आहेत. येथून परदेशात माल आयात आणि निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोने दीड-दोन वर्षांपूर्वीच पावले टाकली आहेत. वसाहतींमध्ये सोनसाखळी चोरी, घरफोड्या, लूट, चोºया, दरोडा अशा घटना घडतात. तसेच जेएनपीटीसारख्या आंतरराष्ट्रीय बंदर, तसेच उरण परिसरातील समुद्रकिनारा यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेची खबरदारी घेणे, महत्त्वाचे आहे. त्यामुळे ५७४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्डाने घेतला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडूनही झालेल्या या मागणीची दखल घेत सिडकोने नवीन पनवेलपासून ते खारघरपर्यंत कॅमेरे बसवले आहेत.उरण परिसर कॅमेºयांच्या प्रतीक्षेतद्रोणागिरी, उलवे, उरण, जेएनपीटी या ठिकाणी २८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या परिसरातून जेएनपीटी मार्ग जात आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे या प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्याकरिता विलंब लागत असल्याने केबल टाकण्याकरिता अडथळा येत असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.सध्या जेएनपीटी रोडच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे केबल टाकण्यास परवानगी दिली, तर ती तुटण्याची शक्यता जास्त आहे. सिडकोचे नुकसान होऊ नये, ही आमची भूमिका आहे. आम्ही कोणतीही आडकाठी घातलेली नाही, इतकेच नाही तर गुरूवारी यासंदर्भात बैठक बोलाविण्यात आली आहे. लवकरात लवकरात याकरिता मार्ग मोकळा करून देण्यात येईल.- प्रशांत फेगडे,राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी,प्राधिकरणअत्याधुनिक कॅमेरेच्सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरिता एक कोटी दहा लाख रूपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.च्कदाचित त्यामध्ये वाढही होऊ शकते.च्अत्याधुनिक स्वरूपाचे त्याचबरोबर अतिशय क्लिअर चित्रण करणारे कॅमेरे वसाहतीत बसविण्यात आले आहेत.च्२९४ कॅमेºयांचे नियंत्रण कक्ष बेलापूर रेल्वेस्थानक इमारतीत आहे.च्त्यावर पोलिसांचे नियंत्रण असल्याचे सिडकोच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडcctvसीसीटीव्ही