शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

डम्पिंग ग्राउंडवर बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: April 14, 2017 03:19 IST

शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील आग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. डम्पिंगवर आग लागून गायकवाडपाडा, कैलास कॉलनी

उल्हासनगर : शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील आग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. डम्पिंगवर आग लागून गायकवाडपाडा, कैलास कॉलनी परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ‘डम्पिंग अ‍ॅक्शन प्लान’ विषयावर आयुक्त सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.उल्हासनगरातील राणा खदाण डम्पिंग ओव्हरफ्लो होऊन तेथे असलेल्या झोपडपट्टीला धोका निर्माण झाला होता. तेथून डम्पिंग हटवून कॅम्प नं.-५ येथील खडी मशीन येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. परिसरातील काही नागरिक नशा करत असल्याने डम्पिंग ग्राउंडवर आगी लावत असल्याची माहिती पालिकेला मिळाली. तेथील आगीचा धूर गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, टँकर पॉइंट, स्वामी शांतिप्रकाश आश्रम परिसरात पसरतो. धुरामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन डम्पिंग बंद करण्याची मागणी पालिकेकडे केली. मात्र, पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेने आग विझवण्यासाठी विशेष पथके नेमली. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)कचऱ्याचे होणार वर्गीकरणडम्पिंगवरील कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी एका सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच डम्पिंगभोवती कुंपण घालणे, कचऱ्याच्या ढिगाचे सपाटीकरण करणे आदी कामे निविदेची वाट न बघता आवश्यक कामांतर्गत त्वरित करण्यात येणार आहे.