शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चोरांना पकडण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांची रात्रीची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:51 IST

वाढत्या चोरींचा बिमोड करण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीची गस्त सुरु केली आहे. मागील चार दिवसापासून ही गस्त सुरु असून, जो पर्यंत चोर पकडला जात नाही, तो पर्यंत ही गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपोलीसांची गस्त सुरुमुख्य प्रवेशद्वावरही विशेष लक्ष

ठाणे - मागील आठवड्यात दोन दिवसाआड घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर भागात घरफोडींच्या घटना वाढल्या आहेत. या घटनानंतर अद्याप पोलिसांच्या हाती चोर सापडलेले नाहीत. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी आता स्थानिकांनीच मानवी साखळी तयार केली असून रात्रीची गस्त सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी सुध्दा या भागात रात्रीची गस्त वाढविली आहे.                           मागील आठवड्यात घोडबंदर भागातील मानपाडा भागात पहाटेच्या सुमारास सहाच्या आसपास चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांनंतर येथील रहिवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या चोरींच्या घटनांमध्ये चोरट्यांनी महापौरांच्या बहिणीच्या घरावर सुध्दा डल्ला मारला होता. या घटनांमुळे हा परिसर हादरा असतांनाच दोन दिवसांनी पुन्हा या भागात चोरीच्या दोन घटनासमोर आल्या. यामध्ये एका बेरीवाल्याचे दुकान फोडण्यात आले आहे. तर दुसऱ्या घटनेतही घरातून ऐवज लंपास झाला आहे. वाढत्या या चोरींच्या घटनांनी मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर, शिवाजी नगर या भागांंना टारगेट केले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे सुध्दा या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परंतु आता या चोरांना पडकण्यासाठी स्थानिकांनीसुध्दा पुढाकार घेतला आहे. ४० ते ५० स्थानिक तरुण मंडळी मागील तीन ते चार दिवसापासून मानपाडा, मनोरमा नगर, शिवाजी नगर, आझादनगर भागात रात्रीच्या गस्तीवर फीरु लागले आहेत.या तरुणांच्या हाती बॅटरी, स्टॅम्प किंवा काठी ठेवली जात आहे. जेणे करुन एखाद्याने हल्ला केला तर किमान त्याला प्रतिक्रार करणे सोपे जाईल या उद्देशाने हे साहित्य हाती ठेवण्यात आले आहे. या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ दोन ते तीन मुले थांबत असून एखादा अनोळखी इसम दिसल्यास त्याचा मोबाइल नंबर घरचा पत्ता विचारला जात आहे. शिवाय घरपर्यंतसुध्दा जात आहेत. तसेच काही छोट्या गल्यांमध्ये वीजेची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना घराबाहेरील लाईट सुरु ठेवण्यासाठी सांगितले जात आहे. तसेच घराचा दरवाजा व्यवस्थीत बंद ठेवावा असेही सांगितले जात आहेत. पोलीससुध्दा या तरुणांच्या मदतीला गस्त देत आहेत.मागील आठवड्यात चोरीच्या घटना वाढल्याने ही रात्रीची गस्त सुरु केली आहे. लोकांची सुरक्षा ही खुप महत्वाची आहे. त्यामुळेच चोर सापडे पर्यंत ही गस्त सुरु राहणार आहे.(राजेंद्र शिंदे - शिवसेना, उपविभाग प्रमुख, घोडबंदर) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCrime Newsगुन्हेगारी