शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचारप्रकरणी सावत्र पित्यापाठोपाठ मित्रालाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 04:43 IST

पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे महिला पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर दीपककुमार मंडल (२३) या मित्रानेही अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

- जितेंद्र कालेकर ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला कासारवडवली पोलिसांनी आठवड्यापूर्वी अटक केली होती. पीडित मुलगी गरोदर असल्यामुळे महिला पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर दीपककुमार मंडल (२३) या मित्रानेही अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोडवरील कॉसमॉस साइटजवळ राहणाºया या १६ वर्षीय सावत्र मुलीसोबत ती घरात एकटी असताना माणिक गायकवाड (नावात बदल) तिच्याशी लगट करायचा. कालांतराने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने नकार दिल्यानंतर तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. याचदरम्यान ती गरोदर राहिली. पोटात त्रास झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्या वेळी तिने सावत्र पित्यामुळेच गरोदर राहिल्याची तक्रार (२२ आॅक्टोबर २०१८) कासारवडवली पोलीस ठाण्यात केली होती.लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध (पॉक्सो), विनयभंग आणि लैंगिक अत्याचार आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करून तिच्या नराधम पित्याला पोलिसांनी अटकही केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. रत्ने यांनीही या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याची तारीख आणि तिने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात ‘संबंध’ आल्याची तारीख यात विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मुलीकडे पुन्हा कसून चौकशी केली. ती काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर, तिला विश्वासात घेतल्यानंतर २३ वर्षीय मित्रानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी २९ आॅक्टोबरला दीपककुमार यालाही अटक केली.डीएनए तपासणीपित्याच्या विचित्र वागण्यामुळे त्याच्या मुलाने त्याला सहा महिन्यांपूर्वीच घराबाहेर काढले होते. मग, मुलीने सांगितलेल्या दिवशी हा प्रकार कोणी केला, याचा शोध घेतल्यानंतर तिच्या मित्राचे नाव समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी त्याची डीएनए तपासणी केली. अर्थात, पित्यानेही तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी अत्याचार केले होते. त्यामुळे यात दोघेही आरोपी असल्याचे उघड झाले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळthaneठाणे