शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी जोडप्याला मारहाण करणाऱ्या परप्रांतीयांवर मनसेच्या विरोधानंतर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: June 7, 2025 23:24 IST

मराठी माणसांवर गुंडगिरी दादागिरी केल्यास मनसैनिक अद्दल घडवतील असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाका येथे कारला धडक देणाऱ्या २ उत्तर भारतीयांनी कारमधील मराठी दांपत्यास मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला आहे. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी आधी तक्रार नोंद केली परंतु मनसेच्या विरोधानंतर गुन्हा दाखल केला.

मीरारोडच्या जेपी नॉर्थ संकुलात राहणारे सुशांत पवार हे पत्नी हसीना व लहान ७ वर्षांच्या मुलीसह कार मधून चालले होते. त्यावेळी भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाका जवळ दुचाकीने कारला धडक दिली. सुशांत यांनी जाब विचारला असता बोलाचाली होऊन सुशांत व पत्नी हसीना यांना मारहाण केली. हसीना यांना छातीवर हाताने धक्का देऊन विनयभंग केला. ह्यावेळी अन्य काही जणांनी जमून मारहाण केली, गाडीची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. तर आमची लहान मुलगी ह्या घटनेने घाबरली होती व आपण हल्लेखोरांना विनंती करून देखील आम्ही मराठी असल्याने मारहाण केली असल्याचा आरोप पवार दांपत्याने केला आहे.

सदर घटना ४ जून रोजी रात्री घडली असता पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र नोंद केली होती. मात्र दुसऱ्या रात्री मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे, अनिल रानवडे आदींसह मनसैनिक पोलिस ठाण्यात जमले व मराठी माणसांवर परप्रांतीय उत्तर भारतीयांनी केलेला हा भ्याड हल्ला सहन करणार नाही असा इशारा दिला. त्या नंतर पोलिसांनी अरुण शिवप्रसाद दुबे (वय ५३) व संजू अशोककुमार सिंग (वय ४७) दोघे रा. साई गुडिया बिल्डिंग, नवघर मार्ग यांच्यावर विनयभंग सह मारहाण आदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. मराठी माणसांवर गुंडगिरी दादागिरी केल्यास मनसैनिक अद्दल घडवतील. सीसीटीव्ही फुटेज तपासून जमलेल्या अन्य लोकांना देखील आरोपी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे असे संदीप राणे म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसे