शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विकासकाकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी नगरसेवक मतलूब सरदार यांस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:48 IST

भिवंडी : महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणी प्रकरणी शांतीनगर पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशीरा ...

ठळक मुद्देगेल्या महिन्यात काँग्रेसचे सभागृह नेता म्हणून नियुक्तीआॅडीओ क्लिपव्दारा पोलीसांत खंडणीचा गुन्हा दाखलनगरसेवक मतलुफ सरदार याने विकासकाकडून मागीतली खंडणी

भिवंडी: महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणी प्रकरणी शांतीनगर पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे .शांतीनगर पिराणीपाडा येथे नुरी अपार्टमेंट या इमारतीचे अनाधिकृत बांधकाम सुरू होते. नगरसेवक मतलूब अफजल सरदार याने सदरची इमारत अधिकृत करण्यासाठी विकासक सलीम अब्दूल हाफिज अन्सारी याच्याकडे पाच लाख रूपयांची मागणी केली. पैश्यासाठी नगरसेवक मतलूब सरदार याने तगादा लावल्याने विकासक सलीम याने चार लाख रूपये देण्याचे कबूल केले. तसेच ही रक्कम कोणाकडे द्यावयाची असे विचारले असता मतलूब सरदार याने रणखांब यांना द्यायचे असल्याचे सांगीतले.या सर्व वार्तालापाची आॅडीओ क्लिप घेऊन विकासक सलीमने शांतीनगर पोलीस ठाणे गाठले आणि आॅडीओ क्लिपचा पुरावा सादर करीत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलीसांनी नगरसेवक मतलूब सरदार यांस अटक केली आहे. मतलूब सरदार गेल्या वीस वर्षापासून पिराणीपाडा या भागातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. गेल्या महिन्यात त्यांची महानगरपालिकेत काँग्रेसचे सभागृह नेता म्हणून नियुक्ती झाली आहे. महानगर पालिकेत अशोक रणखांब हे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पहात आहेत. पोलीसांना दाखल केलेल्या आॅडीओमध्ये रणखांब असा उल्लेख असल्याने शहरात विविद तर्कवितर्क केले जात आहे. पोलीसांनी त्यास अटक करून त्याची रात्री सबजेल मध्ये रवानगी केली आहे. या घटनेने काँग्रेसच्या गोटात व पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी