शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

लॉकडाऊन झाल्यास उद्योग परराज्यात जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय योग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय योग्य ठरणार नाही. गेल्यावर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये जे नुकसान झाले आहे त्याचीच भरपाई अद्याप कारखानदारांची झालेली नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अंबरनाथचे नव्हे तर महाराष्ट्रातील उद्योग हे परराज्यात निघून जातील आणि महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात मागे पडेल असे मत अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी व्यक्त केले.

अंबरनाथमध्ये जे कारखानदार आहेत त्या कारखान्यात कामगार सर्व नियम आणि अटींचे पालन करीत आहेत. कारखान्यांमध्ये काम करत असताना कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच कारखानदार आपल्या कारखान्यात सुरक्षेची यंत्रणा वापरात असल्याने आणि कामगारांची पूर्ण काळजी घेत असल्याने उद्योग किंवा कारखानदारी क्षेत्रात कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण अल्पच राहणार आहे. मात्र राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत दिसत असल्याने ही भूमिका कारखानदारांनासाठी घातक ठरू शकेल, असे मत तायडे यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अंबरनाथमधील उद्योग पूर्णपणे ठप्प झाले होते, असे असतानादेखील सरकारने कोणतीही मदत कारखानदारांना केली नाही. एवढेच नव्हे तर कारखानदारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजही कमी केले नाही. त्यामुळे कारखानदारांना त्यांचा भुर्दंड सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर पाण्याचे आणि विजेच्या बिलांची थकबाकीही व्याजासह वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच कारखानदारांनमध्ये संतापाचे वातावरण असताना पुन्हा लॉकडाऊन करणे म्हणजे अंबरनाथला आणि सोबतच महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात मागे नेण्याचा प्रकार म्हणता येईल.

अंबरनाथमध्ये लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्याऐवजी कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना संघटनेच्या माध्यमातून लसीकरणाची मुभा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोरोनाची लस संघटनेला पुरविल्यास संघटना स्वखर्चाने कामगारांना लस देऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. थेट लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणाच्या मोहिमेवर भर देण्याची गरज आहे. लसीकरणाची क्षमता वाढविल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही आणि कामगारही सुरक्षित राहील.