शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कार्टुन, छत्री पतंगांचे लहान मुलांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:10 IST

मकरसंक्रांतीसाठी शहरातील दुकाने सजली : पाच रुपयांपासून १२०० रुपयांदरम्यान उपलब्ध

जान्हवी मोर्येडोंबिवली : मकरसंक्रांतीला पतंगाचे विशेष महत्त्व आहे. या कालावधीत देशभरात विविध ठिकाणी पतंग उडवण्याची स्पर्धाही होते. इंटरनॅशनल काइट फेस्टिव्हलही होतात. मकरसंक्रांत चार दिवसांवर आल्याने डोंबिवलीमध्ये पतंगांनी दुकाने सजली आहेत. पाच रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंतचे पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. छत्रीपतंग लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे.

माशी, कार्टुन, विविध चित्रे असलेल्या विविध आकारांमध्ये हे पतंग उपलब्ध आहेत. छत्रीपतंगाला चायनापतंगही संबोधले जाते. पूर्वी हे पतंग चीनमधून येत होते, मात्र आता ते महाराष्ट्रातच बनत आहेत. लहान मुलांसाठी हे पतंग विशेष आकर्षण ठरत आहेत. सजावटीसाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या डिझाइनचे लहान पतंगही बाजारात आले आहेत. हे पतंग खासकरून सजावटीसाठी वापरले जातात. शाळांमधूनही मुलांना पतंग आणण्यास सांगितले जाते. त्याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना पतंगांतील विविधता आणि तो तयार करण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवतात.पतंग उडवण्यासाठी आवश्यक असलेल्या फिरक्याही विविध आकारांत उपलब्ध आहेत. काही जण पतंग वाण म्हणूनही दिला जातो. चिनी पतंग बाजारात ८० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. छोटे पतंग पाच आणि १० रुपयांना मिळत असून १२०० रुपयांचा पतंगही बाजारात आला आहे.समुद्रकिनारी हा पतंग उडवला जातो. डोंबिवलीत या पतंगाला फारशी मागणी नसते; मात्र मुंबईत त्याला मोठी मागणी असते, असे विके्रते शिवाजी जाधव यांनी सांगितले.पतंगाचे व्यापारी जाधव यांच्याकडून होलसेल आणि रिटेल विक्रेते पतंग खरेदी करतात. मकरसंक्रांतीला १० ते २० हजार रुपयांपर्यंतचे पतंग विकले जातात, असे त्यांनी सांगितले.किमती ‘जैसे थे’पतंगांच्या मांजाची फिरकी ३० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. नायलॉन मांजावर बंदी असल्याने तो दुकानात ठेवला जात नाही. या फिरकीमध्ये साधा दोरा येतो. कागदी पतंगांबरोबरच आता प्लास्टिकचे पतंगही बाजारात आले आहेत. त्यावर कार्टुनची डिझाइन असते. त्यामुळे लहान मुलांच्या पसंतीला ते उतरत आहेत. यंदा पतंगांच्या किमतीमध्ये कोणतीही भाववाढ नाही, असेही जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे