शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकार रेडिओलॉजिस्टच्या मोटारीने ठाण्यात दोघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अलिकडेच रशिया येथून आलेल्या वाघबीळ येथील हनी प्रदीप पाटील (२६) या ‘क्ष’ किरण तज्ज्ञाने ...

ठळक मुद्दे ठाणेनगर पोलिसांनी घेतले ताब्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही केला पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अलिकडेच रशिया येथून आलेल्या वाघबीळ येथील हनी प्रदीप पाटील (२६) या ‘क्ष’ किरण तज्ज्ञाने (रेडिओलॉजिस्ट) कापूरबावडी ते कोपरी त्यानंतर सिडको बस थांबा या मार्गावर बेदरकारपणे भावाची मोटारकार चालवून दोघांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी त्याला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले.हनी हा भरघाव वेगाने एका आॅडी मोटारकारने येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळाली. माजीवडा येथे नाकाबंदी दरम्यान त्याची कार अडविण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने बॅरिकेटस लावून सापळाही लावला. परंतू, त्यांना धुडकावत त्याने नितीन कंपनी आणि कोपरी मार्गे पळ काढत सिडको याठिकाणी एका अपंगासह दोघांना अडविले. भन्नाट वेगाने आलेल्या हनी याला सिडको बस थांब्याजवळ काही स्थानिक नागरिकांनी अडवून चांगला चोपही दिला. त्यानंतर त्याला ठाणेनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या वाहन चालविण्यावरुन तो मद्यपी असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, त्याने मद्य प्राशन केले नसल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले. त्याच्या कारच्या धडकेने सिडको बस थांब्याजवळ जाधव हे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय, अन्य किरकोळ जखमींपैकी कोणही तक्रार केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले. रेडिओलॉजिस्ट असलेला हनी अलिकडेच रशियातून ठाण्यात आला आहे. त्याने अशा प्रकारे कार का चालविली? याचा तपास करण्यात येत आहे.*वाहतूक पोलिसांमुळे टळला मोठा अनर्थमाजीवडा येथून निघाल्यानंतर वागळे इस्टेट वाहतूक पोलिसांनी कोपरी ब्रीज तसेच नितीन कंपनी येथील उड्डाणपूल बंद केला. त्यामुळे त्याने गुरुद्वारामार्गे कोपरीत शिरकाव केला. जर हे मार्ग अडविले नसते तर पूर्व द्रूतगती मार्गाने मुंबईत शिरकाव करुन त्याने आणखी मोठे अपघात केले असते, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी