शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांच्या मेंदूवर ताण येणार नाही याची काळजी घेणार : शिक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:14 IST

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल.

ठाणे :

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल. लहान मुलांना खेळांच्या माध्यमातून शिकवण्यावर भर दिला जाणार असून, त्यांच्या मेंदूवर अभ्यासाचा ताण येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. शिक्षक संघटनांनी त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकून न पडता नव्या शिक्षण पद्धतीवर लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केले. 

एनईपीच्या युगात  बदलत्या शैक्षणिक परिस्थितीवर विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्र शासन व इस्कोलोर नॉलेज सर्व्हिस प्रा. लि., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घाणेकर नाट्यगृह येथे गुरुवारी ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी केसरकर बोलत होते. ते म्हणाले , विद्यार्थ्यांना सगळ्या कला, कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षणामध्ये मोठे बदल होणार असून, त्या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याबरोबर बैठक होईल. 

एससीईआरटीच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे म्हणाल्या ,  या धोरणामुळे मुलांमधील कला विकसित होईल. शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी म्हणाले ,  हे धोरण  सर्वांना सहशिक्षण, समांतर, गुणवत्ता, परवडणारे, उत्तरदायित्व या पाच स्तंभावर अवलंबून आहे. 

कंपन्यांनी शाळा दत्तक घ्याव्यातजी मुले परदेशात जातील त्यांना तेथील राष्ट्राची भाषा आणि तंत्रज्ञान शिकवणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान असेल. कंपन्यांनी स्वतः शाळा दत्तक घेऊन दर्जात्मक शिक्षणावर भर द्यावा. परराज्यातील शिक्षण पद्धतीमधील उत्तम पद्धती आत्मसात कराव्या लागतील. शिक्षणाबाबत आता एकदाच निर्णय घ्यावा लागेल.  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अनुदानित शाळा आणि शिक्षकांच्या पगारावर सर्वाधिक खर्च होतो. त्यामुळे दर्जात्मक शिक्षणावर त्यांनी भर दिला पाहिजे, यासाठी त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर