बदलापूर : बदलापूरातकोरोनाचे 14 रुग्ण आढळल्यानंतर बदलापूरातील डॉक्टर देखील सतर्क झाले आहे. बदलापूरातील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टराने आपल्या रुग्णालयात जन्माला आलेल्या बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी कक्ष उभारले आहे. बालकाचा जन्म होताच त्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली जाते. तसेच त्याच्या संपर्कात त्याच्या आई शिवाय इतर कोणतेही नातेवाईक येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. बदलापूर हे कोरोनाचे हॉट स्पॉट होत असतांना आता बदलापूरातील खाजगी रुग्णालयाती डॉक्टर देखील सतर्क झाले आहे. बदलापूरातील डॉ. भारती चॅटर्जी आणि डॉ. जॉयदिप चॅटर्जी यांनी आपल्या रुग्णांची योग्य सुरक्षा राखण्याचे काम केले आहे. डॉ. भारती ह्या त्यांच्याकडे जन्माला आलेल्या नवजात बालकांची योग्य काळजी घेत आहे. त्यांच्याकडे नोंदणीकृत रुग्णांवरच ते उपचार करित आहेत. लहान बालकांना इतरांचा त्रस होणार नाही यासाठी देखील प्रय} सुरु आहेत. जन्माला आलेल्या मुलाला इतरांपासुन कोरोनाचा धोका होणार नाही यासाठी खास यंत्रणा उभारली आहे. या रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाला आणि त्याच्या आईची निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यांच्या व्यतिरीक्त इतर कोणीही त्या बालकाच्या जवळ जात नाहीत. बाहेरील व्यक्त आल्यावर बाळाला तात्पुरत्या स्वरुपात मास्क लावले जाते. मास्क असे पर्यंत त्या बाळाजवळ नर्सला ठेवण्यात येते. येवढेच नव्हे तर बाळाच्या आईला देखील मास्क बंधनकारक केले आहे. बाळाचे इतर नातेवाईकांना जवळ जाण्यास मज्जाव घालण्यात येत आहे. बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या सुरक्षेसाठी ह्या अटी घालण्यात आले आहे. बाळ आणि आईला स्वतंत्र कक्षातच ठेवण्यात येते. जेणोकरुन ते इतर रुग्णांच्या संपर्कात येणार नाही.‘‘ बाळाला सतत मास्क लाऊन ठेवता येत नाही. त्याला स्वास घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्या बाळाच्या संपर्कात इतर कोणी येणार नाही याची सर्वाधिक काळजी घेतली जाते. तसेच बाळाची आणि बाळाच्या आईवर उपचार करणारे नर्स हे देखील योग्य दक्षता घेऊनच त्यांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे लहान बालकांवरील धोका कमी होण्यास मदत होते.- डॉ. भारती चॅटर्जी, बदलापूर.
बदलापूरात कोरोनापासुन बचाव करण्यासाठी बालकांची घेतली जाते काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:43 IST
बदलापूरात जन्माला आलेल्या मुलाला इतरांपासुन कोरोनाचा धोका होणार नाही यासाठी खास यंत्रणा उभारली आहे. या रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाला आणि त्याच्या आईची निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहे.
बदलापूरात कोरोनापासुन बचाव करण्यासाठी बालकांची घेतली जाते काळजी
ठळक मुद्देबदलापूर हे कोरोनाचे हॉट स्पॉटजन्माला आलेल्या नवजात बालकांची विशेष काळजी