शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार व्हीआयपी; तरी पोलिसांची थकबाकी, थकविला २३ कोटींचा दंड

By जितेंद्र कालेकर | Updated: April 26, 2023 11:54 IST

तीन महिन्यांत एक लाख वाहनचालकांनी थकविला २३ कोटींचा दंड

जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन महिन्यांमध्ये एक लाख ९९ हजार ८६३ चालकांनी दंडाची २३ कोटी २४ लाख ५४ हजार ६५० इतकी रक्कम थकविली आहे. ही रक्कम भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सिग्नल तोडण्यापासून ते अगदी सिटबेल्ट न लावण्यापर्यंत अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रास केले जाते. यात मग अगदी व्हीआयपी क्रमांकाच्या कारही मागे नाहीत. गेल्या वर्षभरात २०२२ मध्ये एक लाख ७८ हजार ९३१ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यातील सात लाख ७५ हजार २१५ चालकांची ५५ कोटींच्या घरात दंडाच्या थकबाकीची रक्कम होती.

दंड भरण्याचे आवाहनदोन वर्षांपूर्वी ठाणे वाहतूक पोलिसांनी आवाहन केल्यानंतर ठाण्यातील अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांनीही त्यांच्या व्हीआयपी वाहनांवर असलेल्या दंडाची रक्कम स्वत:हून भरली होती. अजूनही काही व्हीआयपी मोटार कारच्या दंडाची रक्कम बाकी आहे.१० हजारांपेक्षा जास्त दंड असल्यास जप्तीवाहनधारकाने वाहतुकीचे नियम तोडू नये यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नियम तोडणाऱ्यांच्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. १० हजारांपेक्षा जास्त दंड असल्यास तशी नोटीस बजावली जाते. प्रसंगी वाहन जप्तही केले जाते. 

 वाहतूक पोलिसांनी केली कारवाई ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेकांनी दंडाची रक्कम थकविली. जानेवारी ते २४ एप्रिल २०२३ या चार महिन्यांमध्ये एक लाख ९९ हजार ८६३ चालकांकडे दंडाची २३ कोटी २४ लाख ५४ हजार ६५० थकबाकी आहे. 

१२ कोटी ७० लाखांचा दंड वसूल जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षभरात नियम मोडणाऱ्या नऊ लाख ७८ हजार ९३१ चालकांवर कारवाई झाली. यातून १२ कोटी ७० लाख ७६ हजार २०० इतका दंड  वसूल झाला आहे. 

नियमांचे उल्लंघन करून अपघाताबरोबरच दंड आणि पोलिस कारवाईला निमंत्रण देऊ नये. कारवाई झालीच, तर दंडाची रक्कमही भरावी. ती न भरल्यास न्यायालयामार्फत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. - डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा.

टॅग्स :carकारPoliceपोलिस