शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाट वाढवलेली पाणीपट्टी रद्द करा; भाईंदर आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:58 IST

मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही. त्यामुळे शहरात उरल्यासुरल्या उद्योगांचे स्थलांतर होण्याची शक्यता असल्याने ते रोखण्यासाठी प्रशासनाने ते दर त्वरित रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टील उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पांडे यांनी पलिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे.शहरातील स्टील उद्योग एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठा उद्योग मानला जात होता. यातील अनेक व्यापाऱ्यांनी जकात, स्थानिक संस्था करासह पालिकेच्या विविध वसुलीला कंटाळून शहरातून स्थलांतर केले. उर्वरीत उद्योग आजही सुरू असुन त्यातील रोजगारामुळे शहरातील अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या उद्योगांत सुमारे १० हजारांहून अधिक लोक काम करतात. कारखानदारांना यंदाच्या महागाईच्या काळात उद्योग चालविणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे कामगारांचे वेतन वाढले असून उद्योग चालवण्याचे संकट उभे असताना पालिकेने वाढवलेल्या व्यावसायिक पाणीपट्टीचा दरही भरमसाठ असल्याचा दावा शैलेश यांनी केला आहे. पालिकेने तत्कालीन महासभेत पाणीपट्टीच्या दरवाढीचा सादर केलेल्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने मान्यता दिल्याचा आरोप शैलेश यांनी केला आहे.पूर्वीच्या २० रुपये प्रती १ हजार लीटर व्यावसायिक पाणीपुरवठ्याचा दर तब्बल १५० टक्के वाढून तो थेट ५० रुपये प्रती १ हजार लीटर करण्यात आल्याने व्यापाºयांना भरमसाठ पाणीपट्टीची बिले वितरीत करण्यात आली आहेत. ही दरवाढ जाचक असून त्वरीत रद्द करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक