शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'ठेकेदाराचे ४२ कोटींचे चांगभले करणारा प्रस्ताव रद्द करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:32 IST

मिलिंद पाटणकर यांची मागणी; महापौरांना लिहिले पत्र

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत आलेल्या भुयारी गटार योजनेच्या ४२ कोटी रु पयांच्या वाढीव खर्चाच्या प्रस्तावामागे ठेकेदाराचे भले करणे, हाच प्रशासनाचा उद्देश असल्याचा आरोप करून तो नामंजूर करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.या भुयारी गटार योजना प्रकल्पास मंजुरी देण्यापूर्वी तांत्रिक सल्लागार मे. युनिटी कन्सल्टंट यांच्याकडून दोनदा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी उपस्थित केलेले मुद्दे व त्रुटींची पूर्तता केल्यानंतर शासनाने प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय १७९ कोटी एक लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. यावर ठाणे महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावित दरानुसार महासभेने पाच टक्के जास्त दराच्या निविदेला १८९ कोटी रुपये, खर्चाला ३५ अ नुसार मान्यता दिली. असे असतानासुद्धा आता पुन्हा या प्रकल्पाकरिता प्रशासनाने वाढीव ४२ कोटी रुपये खर्चाला मंजुरी मागितली आहे. गंभीर बाब म्हणजे यात सर्व अभियांत्रिकी चुका असल्याने तांत्रिक सल्लागार, नगर अभियंते, मलनि:सारण अभियंते व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंते यांना जबाबदार धरून अंदाजखर्च तयार करताना त्यांनी आयुक्त, महासभा यांची दिशाभूल केल्याचा आरोप केल्याचे सांगून तसा ठराव करून तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.रॉयल्टी बुडविणाऱ्या ठेकेदाराच्या फायद्यासाठी प्रशासनाचा आटापिटाया सर्व चुका जाणीवपूर्वक केल्या असून दोन वर्षांनी वाढीव खर्चाची मंजुरी घेऊन ठेकेदाराचा फायदा करून द्यायचा प्रशासनाचा उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यातही भुयारी गटार योजनेचे काम करताना वापरलेल्या गौण खनिजांसाठीची रॉयल्टी भरली नसल्याप्रकरणी किंवा अपुरी भरली असल्याप्रकरणी जिल्हाधिकारी व लोकायुक्त यांनी उर्वरित रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, या ठेकेदाराने निविदेतील अटी, इतर सर्व शासकीय देणी महसूल खात्याकडे जमा करून महापालिकेस पावती सादर करणे आवश्यक आहे. परंतु, या अटीचा भंग केला आहे. निविदेतील अट पाळली नाही म्हणून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्याला आणखी ४२ कोटी वाढीव मंजुरी देण्याचा घाट अयोग्य असून हा प्रस्ताव नामंजूर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका