शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचा अहवाल मागवला; हप्तेखोर सहायक आयुक्तांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:22 IST

फेरीवाल्यांवर कारवाईचा मुद्दा ठामपा महासभेत गाजला

ठाणे : गेल्या १० दिवसांत पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ज्याज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्याची कारणे व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी तपशीलवार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. नालेसफाई आणि प्रभाग समितीनिहाय फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ मागवण्याच्या सूचना त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना केल्या. त्यामुळे सदस्यांनी बुधवारी हप्तेखोरीचा आरोप केलेल्या सहायक आयुक्तांची पाचावर धारण बसली आहे.गुरुवारी सकाळी सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये किती ठिकाणी पाणी साचले होते, ते साचण्याची कारणे काय होती आणि त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या, याचा संध्याकाळपर्यंत अहवाल मागवला असून तो प्राप्त झाल्यानंतर ज्याज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या सर्व ठिकाणी संबंधित अधिकाºयांसोबत तपशीलवार चर्चा करण्यात येणार आहे.नालेसफाईच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी झालेल्या कामाचा छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश घनकचरा विभागास दिले, तर प्रभाग समिती स्तरावर फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवालही सायंकाळपर्यंत मागवण्याचे आदेश अतिक्र मण विभागास दिले. दरम्यान, पावसाळा सुरू असला तरी पाणीकर, मालमत्ताकर वसुलीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगून त्यांनी सर्व विभागप्रमुखांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.सहायक आयुक्त बिथरलेनालेसफाई आणि प्रभाग समितीनिहाय फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ मागवल्याने हप्तेखोरीचा आरोप झालेले सर्व नऊ सहायक आयुक्त कमालीचे बिथरले आहेत. या अहवालानंतर आयुक्त त्यांना पाठीशी घालतात की, निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करतात, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. ठाणे स्थानक परिसर, नौपाडा परिसर, वागळे इस्टेट, कोपरी, माजिवडा परिसरांत सर्वाधिक फेरीवाले असल्याने तेथील अधिकारी कमालीचे धास्तावले आहेत.अंबिकानगरात कारवाईमहापालिकेच्या महासभेत बुधवारी फेरीवाल्यांवरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गुरुवारी वागळे प्रभाग समिती कार्यालयाने अंबिकानगर येथील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करून जवळपास ७० हातगाड्या, सहा बाकडी, पाच लोखंडी टेबल गुरुवारी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. ही कारवाई वागळे प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी केली असून यापुढेही अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका