शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील हजारो कोटींच्या घोटाळयातील कंपनीचा सीए ठाण्यातून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:52 IST

मुंबईतील ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याच कंपनीत चार हजार कोटींचा घोटाळाही झाला आहे. त्यामुळे सागरच्या बेपत्ता होण्याने कुटूंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारटिटवाळयाला जाऊन येतो, इतकीच दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा असलेल्या मुंबईतील ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८, रा. चरई, ठाणे) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटूंबियांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या बेपत्ता होण्यामागे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.ठाण्यातील चरई भागात राहणारे सागर हे ११ आॅक्टोबर रोजी टिटवाळयाला जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले. ते एमएच- ०४- जीएम-३५१५ या क्रमांकाच्या मोटारकारने कंपनीच्या टिटवाळा येथील कार्यालयाकडे गेल्याचे सांगण्यात येते. ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या कंपनीच्या मुंबई आणि टिटवाळा येथे शाखा आहेत. या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे. त्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली आहे. याच प्रकरणातील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात गेल्या आठवडयापूर्वी बोलविले होते. त्यांच्याकडे आणखी चौकशी बाकी असल्यामुळे त्यांना पुन्हा १३ आॅक्टोबर रोजी पाचारण करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच ११ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास टिटवाळा येथे जाऊन येतो, असे त्यांनी त्यांचे वडील सुहास देशपांडे यांना सांगितले. त्यानंतर ते परत न आल्यामुळे याप्रकरणी देशपांडे कुटूंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १२ आॅक्टोबर रोजी ते बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज जोंधळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.* ज्या कंपनीत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याच कंपनीचे सीए असलेले सुहास ठाण्यातून अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं