शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोट खाडीतच टाकली तोडून; मुंब्रा खाडीत महसूल विभागाची धडक माेहीम

By जितेंद्र कालेकर | Updated: October 4, 2023 22:23 IST

ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्याने ही बोट पाण्यात तोडण्यात आली.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे तहसीलदार यांच्या माध्यमातून मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी धडक कारवाई केली. मुंब्रा ते डोंबिवली या खाडीपात्रात गस्त घालताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ही अवैध वाळू उपसा करणारी बोट आढळली. त्यानंतर नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि ठाणे तलाठी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली. ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्याने ही बोट पाण्यात तोडण्यात आली.

मुंब्रा खाडीच्या पात्रामध्ये १२ सप्टेंबर रोजी जिलेटीन आणि डेटिनोटरच्या कांड्या असलेली अनधिकृत बोट आढळली होती. बुधवारी पुन्हा अशी अनधिकृत बोट खाडीपात्रात आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यामुळे खाडीपात्रात मेरिटाइम बोर्ड व सागरी पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सकाळी पाच वाजल्यापासून खाडीपात्रात सर्च ॲापरेशन केल्यानंतर पाच ते सहा तासांनंतर एक अनधिकृत बोट आढळली आणि तिच्यावर यशस्वीरीत्या कारवाई पूर्ण करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली. या वेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दक्षता पथक दाेनच्या टीमसह तलाठी सोमा खाकर, अरुण कासार, नीलेश कांबळे, राहुल भटकर, रत्नदीप कांबळे, सतीश चोधरी, धोंडिबा खानसोले, मंडळ अधिकारी राजेश नरोटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्रा