शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा बँकेत बविआ प्रणित पॅनलची सत्ता, जिंकल्या २१ पैकी १८ जागा; महाविकास आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:31 IST

ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या महत्त्वाच्या बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

नालासोपारा : ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या महत्त्वाच्या बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तब्बल साडेदहा हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बँकेच्या संचालक मंडळातील २१ जागांपैकी १८ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले. त्यांनी महाविकास आघाडी प्रणित महाविकास परिवर्तन पॅनलवर विजय मिळविला.  ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या, तर उरलेल्या १५ संचालकांसाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सहकार आणि महाविकास परिवर्तन पॅनलचे प्रत्येकी १५ उमेदवार आणि १६ अपक्ष उमेदवार सहभागी झाले होते. जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या महाविकास परिवर्तन पॅनलच्या प्रचारासाठी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड असे दोन मंत्री आले होते, परंतु त्याचा प्रभाव मतदानावर पडला नसल्याचे पाहायला मिळाले.   बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनलने ही निवडणूक शिट्टी या चिन्हावर आणि महाविकास परिवर्तन पॅनलने कपबशी या चिन्हावर लढविली. या निवडणुकीत चार फेऱ्यांमध्ये ९१ टक्के मतदान झाले होते. बुधवारी लागलेल्या निकालानुसार, बहुजन विकास आघाडीच्या सहकार पॅनलने एकूण १८ जागांवर विजय मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालक मंडळावर बविआचे वर्चस्व असेल. आम्ही सतत पाच वर्षं लोकांच्या सेवेत इथेच असतो. फक्त निवडणुकीपुरते लोकांना सामोरे जात नाही. त्यामुळे हा विजय म्हणजे मतदारांनी आमच्या सेवेला दिलेला कौल आहे, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली, तसेच पाच वर्षांपूर्वी बँकेच्या ठेवी साडेसहा हजार कोटींच्या घरात होत्या, पण चार वर्षांमध्ये त्यात आणखी चार हजार कोटींची भर टाकण्यात आम्हाला यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकVasai Virarवसई विरार