शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

घर, वाहन खरेदीला ‘अच्छे दिन’; जीएसटी, केवायसीच्या सक्तीमुळे गतवर्षीपेक्षा सोने खरेदी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:48 IST

नोटबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे ठाण्यातील घरांचे दर काही अंशी का होईना वाढले असतानाही शनिवारी दस-याच्या मुहूर्तावर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे.

ठाणे/डोंबिवली : नोटबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे ठाण्यातील घरांचे दर काही अंशी का होईना वाढले असतानाही शनिवारी दस-याच्या मुहूर्तावर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर परिसरातील ३५ घर खरेदीची प्रत्यक्ष नोंदणी झाल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले. त्याचवेळी दसºयाच्या पूर्वसंध्येला ८५६ तर प्रत्यक्ष दसºयाच्या मुहूर्तावर ३२६ दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. घर व वाहन खरेदीबाबत आश्वासक चित्र असताना सोने खरेदीत मात्र निम्म्याने घट झाल्याचे सराफ व्यापाºयांचे म्हणणे आहे.दसºयाच्या मुहूर्तावर बिल्डरांकडून विविध आकर्षक योजनांची घोषणा केली गेली. प्रती चौरस फुटांच्या दरामध्ये कपात किंवा घर खरेदीवर वाहन, मोबाईल किंवा तत्सम वस्तुंची भेट देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. नोटाबंदीने अनेक बिल्डरांचे कंबरडे मोडले असताना जीएसटी लागू झाल्याने ते धास्तावले होते. त्यातच रेरा कायद्यानुसार नोंदणीपासून अनेक अटी लागू झाल्याने बिल्डर खासगीत नाराजी प्रकट करीत होते. ठाण्यातील घरांच्या दरात जीएसटीमुळे काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीचा दर हा कमी करुन ७ टक्क्यापर्यंत आणावा, अशी मागणी ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे.दसºयाच्या मुहुर्तावरही अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. नोटबंदी नंतर ठाण्यात गृह खरेदीचा प्रत्येक दिवशीच कल हा ५ ते १० फ्लॅट असा होता. परंतु आता बँकाचे व्याजदर स्थिर असल्याने आणि काही बँकांनी व्याज दरात कपात केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.सुमारे २५० च्या आसपास घरांची विक्री झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात एक दिवसानंतर हा आकडा किती आहे, याचा अंदाज येऊ शकणार आहे.घडणावळीवर सूट जाहीर करूनही निराशादरवर्षी दसºयाच्या मुहूर्तावर केल्या जाणाºया सोने खरेदीवर यंदा जीएसटीमुळे विपरीत परिणाम झाला असून खरेदी निम्म्याने घटल्याचे सराफा व्यापाºयांनी सांगितले. त्यातच आता ५० हजारांवरील व्यवहारांना केंद्र सरकारने चाप लावला असून त्यावरील व्यवहार करणाºया ग्राहकांचे ‘केवायसी’ आवश्यक केले आहेत. दिवाळीतही असेच वातावरण असल्यास या व्यवसायावर मंदीचे सावट येईल अशी भीती आॅल इंडीया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन असो.चे विभागीय संचालक, ठाण्याच्या चिंतामणी ज्वेलर्सचे संचालक नितीन कदम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.ते म्हणाले की, मार्चच्या तुलनेत चांदीत दोन हजारांची घट झाली आहे, पण तरीही मागणी मात्र नाही. गुढीपाडव्याला ग्राहकांनी परंपरेसाठी सोनं खरेदी करण्याचा उत्साह दाखवला. पण त्यानंतर सातत्याने बाजार गडगडत असल्याचे कदम म्हणाले. मार्चमधील इलेक्ट्रॉनिक पेमेंटला ग्राहकांची पसंती आता राहीली नसून कार्डपेमेंट कमी झाले आहे.अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोन्यावरील दागिन्यांच्या घडणावळीत १५ ते २५ टक्के सूट, हिºयाच्या घडणावळीत ५० टक्के सूट जाहीर करुनही फारसा फरक पडला नाही, अशी तक्रार आहे. दसºयाच्या दिवशी सोन्याचे नाणे खरेदीवर अधिक भर असतो. यंदा मात्र नाणे खरेदीवर परिणाम झाला असल्याचे गणपत सावंत यांनी सांगितले.पूर्वसंध्येलाच वाहन खरेदीचा उत्साहदसºयाच्या शुभमुहूर्तावर ठाण्यात ३२६ वाहनांची नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात झाली आहे. मात्र, दसºयापेक्षा त्याच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यात तब्बल ८५६ वाहनांची नोंदणी झाली आहे. या दोन्ही दिवसात ठाणेकरांनी सुमारे ८०० मोटारसायकल खरेदी केल्या आहेत. दसºयाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत वाहन खरेदी अपेक्षित असल्याने नोंदणीचा आकडा वाढण्याची शक्यता आरटीओने वर्तविली आहे.प्रादेशिक परिवहन विभागाने अद्ययावत ई-रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर विकसित केल्याने वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत थेट आॅनलाइन पद्धतीने होत आहे. ठाण्यात दुपारपर्यंत ३२६ वाहनांची नोंदणी झाली होती.त्यामध्ये २५३ दुचाकी, ७५ इतर वाहनांचा समावेश आहे तर, दसºयाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात ८५६ वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये ४१८ मोटार सायकल तर २१० चारचाकी तर उर्वरित इतर वाहने आहेत.ठाणे शहर घर नोंदणी कार्यालयात दिवसभरात ३५ घर खरेदी व्यवहारांची नोंदणी झाली.-अमोद यादव, नोंदणी उपमहानिरीक्षक, कोकण विभागसोने खरेदीकडे महिलांचाच कल अधिक होता. यात नेकलेस, अंगठी, कानातले या दागिन्यांना सर्वाधिक पसंती होती.लोकांनी सोने खरेदी केले पण जीएसटीमुळे त्याचे प्रमाण अत्यल्प होते. - कमलेश जैनसध्या स्थिर असलेले घरांचे दर जीएसटीमुळे भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. - मुकेश सावला, एमसीएचआययंदा सोने खरेदीत मागच्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली. बहुतांश ग्राहक जीएसटी भरायला तयार होत नव्हते.- कमलेश श्रीश्रीमल, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष

टॅग्स :Dasaraदसरा