भिवंडी : शहरातील तेलुगू समाजाच्या हजारों कुटूंबांनी नववर्षाच्या दिवशी ‘पछडी’ प्रथेच्या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने मातीचे मडके खरेदी केले.त्यामुळे शहरात गेल्या तीन दिवसांपासून मातीच्या मडक्यांची चांगलीच लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल झाली.शहरात कामतघर,पद्मानगर,कणेरी,कोंबडपाडा,नवीवस्ती,सुभाषनगर,नारपोली,गौरीपाडा आदि भागात लाखोच्या संख्येने तेलुगू समाज रहात आहे.हा समाज कापड उद्योगाच्या निमीत्ताने तेलंगणा व आंध्रप्रदेशांतून शहरात आल्याने, ही कुटूंबे तेथील सर्व सण येथे उत्साहाने व आनंदात साजरे करतात.नववर्षाच्या निमीत्ताने ही कुटूंबे‘पछडी’ हा सण देखील साजरा करीत असतात. त्यानिमीत्ताने मातीच्या मडक्याची पुजा करून मडक्यातील पाणी पिण्यास सुरूवात करतात.सर्वसाधारण होळीनंतर उन्हाचे तपमान वाढण्यास सुरूवात होते.हे उन कुटूंबाला बाधू नये व मडक्यातील थंड पाणी मिळावे म्हणून विधीवत पुजा करून मातीचे मडके वापरात घेतले जाते.बाजारातून मातीचे मडके खरेदी करून त्याची देव्हाऱ्यासमोर पुजा मांडली जाते.पाण्याने भरलेल्या मडक्यात चिंचेचा रस,कैरी,नवीन गुळ,फुटाणे,लिंबाची पाने फुलासह टाकली जातात.त्याचे पुजन करून ते कुटूंबातील लोकांंना व घरी आलेल्या पाहूण्याना दिले जाते.दिवसभर मडक्यातील पाणी पिऊन ते संपल्यानंतर थंड पाणी पिण्यासाठी या मडक्याचा घराघरांत उपयोग केला जातो.तेलुगू समाजातील या प्रथेला ‘पछडी’असे म्हटले जाते.या निमीत्ताने पद्मानगर,कामतघर,कुंभारवाडा,नवीवस्ती व कारीवली या भागात हजारोंच्या संख्येने मडक्यांची विक्री झाली.शहरात सर्व जातीधर्माचे लोक रहात असल्याने नववर्षाच्या निमीत्ताने नवीन भांडे खरेदी करण्याच्या निमीत्ताने देखील इतरांनी मातीच्या मडक्यांची खरेदी केली.
नववर्षाच्या निमीत्ताने भिवंडीतील तेलुगू समाजाची मातीच्या मडक्यांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 14:11 IST
भिवंडी : शहरातील तेलुगू समाजाच्या हजारों कुटूंबांनी नववर्षाच्या दिवशी ‘पछडी’ प्रथेच्या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने मातीचे मडके खरेदी केले.त्यामुळे शहरात गेल्या तीन दिवसांपासून मातीच्या मडक्यांची चांगलीच लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल झाली.शहरात कामतघर,पद्मानगर,कणेरी,कोंबडपाडा,नवीवस्ती,सुभाषनगर,नारपोली,गौरीपाडा आदि भागात लाखोच्या संख्येने तेलुगू समाज रहात आहे.हा समाज कापड उद्योगाच्या निमीत्ताने तेलंगणा व आंध्रप्रदेशांतून शहरात आल्याने, ही कुटूंबे ...
नववर्षाच्या निमीत्ताने भिवंडीतील तेलुगू समाजाची मातीच्या मडक्यांची खरेदी
ठळक मुद्देभिवंडीत रहातात तेलुगू समाजाची लाखो कुटूंबेतेलुगू समाजाच्या पछडी प्रथेच्या निमीत्ताने लाखो रूपयांची मडके विक्रीमातीच्या मडक्याची पुजा करून वापरात घेतात