शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या चौक गावातील बस स्थानकाचे नाव अखेर 'बांगलादेश' ऐवजी झाले  'इंदिरा नगर'

By धीरज परब | Updated: June 21, 2023 15:53 IST

चौक गाव हे मच्छीमारांचे गाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक गावातील एका बस स्थानकास बांग्लादेश असे तेथील प्रचलित झोपडपट्टीचे नाव दिल्या प्रकरणी खासदार राजन विचारेंसह स्थानिक माजी नगरसेवकांनी विरोध केल्यावर महापालिकेने अखेर त्या बस स्थानकाचे नाव बदलून इंदिरा नगर असे केले आहे. 

चौक गाव हे मच्छीमारांचे गाव आहे . ह्या गावाच्या बाहेरच्या बाजूला १९९५ साली ठाणे जिल्हा परिषदेने इंदिरा आवास योजने अंतर्गत अल्पभूधारकांना १५ घरे बांधून दिली होती . तर १९९३ साली लातूर जिल्ह्यातील भूकंपा नंतर १५ ते ३० ते बेलदार (वडार ) समाजाची कुटुंबे येथील सरकारी जागेवर झोपड्या बांधून राहू लागली होती . सरकारी जागा असल्याने हळूहळू कर्नाटकच्या गुलबर्गा भागातून काही लोक आले तर काही मुस्लिम कुटुंबही स्थायिक झाले. 

मात्र ह्या झोपडपट्टीला बांगलादेश असे नाव प्रचलित झाले . त्या प्रचलित नवा प्रमाणेच घरांचे पत्ते व पालिका आदींच्या नोंदी सुद्धा बांगलादेश असा उल्लेख सुरु झाला . मध्यंतरी बांग्लादेश नाव प्रचलित झाल्याच्या संदर्भात मुद्दे उपस्थित झाले. परंतु प्रशासनाने फारसे गांभीर्य दाखवले नाही . 

नुकतेच महापालिकेने येथील बस थांब्यास बांग्लादेश असे नाव दिल्याने टीका सुरु झाली . मनसेने फलक तोडून काळे फसले . तर माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, जॉर्जी गोविंद आदींनी सदर बाब खासदार राजन विचारे यांच्या कडे मांडली . खा . विचारे यांनी बस स्थानकाचे नाव बदलण्यासह महापालिका आणि शासकीय नोंदीतून देखील बांग्लादेश हा उल्लेख वगळून इंदिरा गांधी नगर अशी नोंद करून घेण्याची मागणी केली . तसे पत्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदींना दिले . मंगळवारी महापालिकेकडून चौक येथील बस स्थानकास इंदिरा नगर असे नाव असलेला फलक लावला आहे . पालिका व शासकीय नोंदींतून देखील बांग्लादेश हा उल्लेख बदलण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे शर्मिला बगाजी यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर