शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पुन्हा बर्निंग कार! धावत्या कारला लागली आग; सलग दुसरी घटना

By अजित मांडके | Updated: July 18, 2023 12:00 IST

ही बाब लक्षात येतात, पुराणिक यांनी गाडी रस्यावर उभी केली, पण आगीने काही क्षणात रुद्र रूपधारण केल्याने त्या आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या दुसऱ्या चारचाकी कारला बसली

ठाणे - नाशिककडून मुंबईला सोमवारी सकाळी निघालेल्या धावत्या कारला आग लागल्याची घटना ताजी असताना, घोडबंदर रोडने वागळे इस्टेटकडे निघालेल्या धावत्या कारने घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नल समोर पेट घेतल्याची मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या अन्य एका कारला बसली आहे. एकीकडे पाऊस पडत असताना, त्या भर पावसात दुसऱ्या धावत्या कारने पेट घेतल्याचे समोर येत आहे. अशाप्रकारे ठाण्यातील चोविस तासातील ही दुसरी घटना आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र पेट घेतलेली कार जळून खाक झाली आहे. 

मानपाडा येथील संजय पुराणिक हे मंगळवारी सकाळी मानपाडा येथून वागळे इस्टेट येथे जात असताना, घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नलवर येताच अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. ही बाब लक्षात येतात, पुराणिक यांनी गाडी रस्यावर उभी केली, पण आगीने काही क्षणात रुद्र रूपधारण केल्याने त्या आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या दुसऱ्या चारचाकी कारला बसली . या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. त्यानंतर त्या आगीवर जवळपास दहा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत पुराणिक यांची कार जळून खाक झाली असून आनंद गुप्ता यांच्या कारला आगीची झळ लागल्यामुळे त्या कारचे फायबर मेल्ट होऊन किरकोळ नुकसान झाले आहे. आग लागली तेंव्हा पुराणिक हे एकटेच प्रवास करत होते. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.