शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मीरारोड मध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: October 23, 2023 21:03 IST

व्यापाऱ्यांचा बंद तर लोकांच्या संतापा नंतर महापालिकेला कारवाईची जाग

धीरज परब / मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मध्ये अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या दादागिरी व गुंडगिरी ने रहिवाशी , दुकानदार त्रासले असताना रविवारी रात्री एका ६० वर्षीय दुकानदारास मारहाण केल्या प्रकरणी २५ ते ३० फेरीवाल्यांवर नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या  घटनेने संतप्त दुकानदारांनी बंद पुकारला तर रहिवाश्यांनी तत्कालीन नगरसेवक आणि महापालिकेच्या हप्तेखोरीमुळे फेरीवाले प्रचंड वाढून गुंडगिरी होत असल्याचा आरोप केला . पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला तर पालिकेने फेरीवाल्यांचे शेड आदी तोडण्यास सुरवात केली. 

शांती नगर सेक्टर १ , इमारत क्र . ५९ मध्ये दुकान ५ व ६ मध्ये मायरी नावाचे गुमानसिंग राजपुरोहीत ( ६० ) यांचे दुकान आहे . दुकान समोर त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती . रविवारी रात्री ११ च्या सुमारास एका फेरीवाल्याने त्याची दुचाकी काढताना राजपुरोहित यांच्या दुचाकीचे सीट कव्हर फाटल्याने त्यांनी हळू गाडी काढ असे फेरीवाल्यास सांगितले . त्याचा राग येऊन अशीच गाडी लावेन सांगून आरडाओरडा व शिवीगाळ सुरु केली . त्यासरशी अन्य फेरीवाले धावून आले . 

फेरीवाल्यांची राजपुरोहित व त्यांचा कर्मचारी करणसिंग ह्या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेने संतप्त दुकानदार, काही नागरिक पोलीस ठाण्यात दाखल झाले .  आमदार गीता जैन पहाटे २  च्या सुमारास पोहचल्या नंतर पोलिसांनी हल्लेखोर अजहर हैदर शेख, झोएब अल्ताफ शेख व अन्नान मोहमद सुतार, राजपुरोहित यांच्या दुकान समोर बाकडे लावणारे दोघे आणि इत्तर  २० ते २५ फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . 

सोमवारी घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या  भागात पोलिसांसह एआरपीची तुकडी तैनात केली . परिसरात तणावपूर्ण शांतता होती . दुकानदारांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला . आ . जैन यांनी पालिका आयुक्त संजय काटकर , उपायुक्त अतिक्रमण मारुती गायकवाड व पोलिसांसह शांती नगर मध्ये जाऊन रहिवाशी आणि दुकानदार यांचे म्हणणे ऐकले . 

यावेळी काही रहिवाशी आणि दुकानदारांनी महापालिका, पोलीस तसेच तत्कालीन अनेक नगरसेवकां बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करत यांच्या हप्तेखोरी मुळेच शांती नगर मध्ये फेरीवाल्यांनी रस्ते , पदपथ व मोकळ्या जागांवर बस्तान मांडले . सोसायटीचे प्रवेश द्वार सुद्धा सोडले नाहीत . 

गेल्या अनेक वर्षां पासून तक्रारी करून सुद्धा ठोस कारवाई हो नसल्याने फेरीवाले मुजोर होऊन त्यांची गुंडगिरी अनेक वर्षां पासून रहिवाशी सहन करत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले . गुंडगिरी , चोऱ्या , महिला - मुलींची छेडछाड सारखे प्रकार होऊन सुद्धा कोणी गांभीर्याने घेतले नाही असे आरोप लोकांनी केले . 

या घटने नंतर महापालिकेने फेरीवाल्यांचे शेड , बाकडे आदी अतिक्रमणे जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने काढण्यास सुरवात केली . परंतु हि कारवाई केवळ दिखाव्या पुरती नको.  पालिका पथक येणार याची माहिती फेरीवाल्यांना आधीच मिळते. पथक आले तर थातुरमातुर कारवाई करून निघून जाते असे लोकं म्हणाले .

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोडMumbaiमुंबई