शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या मार्गातील माती भिवंडी, नवी मुंबईत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 05:24 IST

मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान सुमारे ५०८.१० किलोमीटर बुलेट ट्रेन धावणार आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान सुमारे ५०८.१० किलोमीटर बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गातील माती, गाळ, दगडांचे शेकडो ट्रक निघणार आहेत. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडी तालुक्यातील दापोडे गावाजवळील जागेसह नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदराजवळील जासई गावचे मोकळे माळरान प्रस्तावित केले आहे.मुंबईसह ठाणे परिसरात मेट्रो, बुलेट ट्रेन आणि नवघर ते चिरनेर मल्टिकॉरिडॉर आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी सध्या जमीन संपादनाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ठाणे जिल्ह्यातून ३९.६६ किलोमीटर धावणार आहे. या प्रकल्पासाठी तयार होणाºया मार्गातील माती, दगड मोठ्या प्रमाणात निघणार आहे. त्यांची विल्हेवाट लावणे प्रकल्प व्यवस्थापकांची डोकेदुखी ठरणार आहे. त्यावर, वेळीच उपाययोजना म्हणून भिवंडी तालुक्यातील दापोडे परिसरातील सर्व्हे क्रमांक ११५ च्या मोकळ्या जागेतही या मातीचा भराव होईल.सध्या बुलेट ट्रेनसाठी आवश्यक १९ हेक्टर शेतजमीन मोजमापाचे काम सुरू आहे. यामध्ये ठाणे तालुक्यातील १९ गावांमधील २५० शेतकºयांची शेती आहे. या १०४ प्लॉट्सचे संपादन भूमिअभिलेख विभाग करत आहे. शीळ, डावले, पडले, आगासन, बेतवडे, लहानी देसाई, मोठी देसाई या गावांमधील शेती व सरकारी जमिनींचे मोजमाप सुरू आहे. बीकेसीतून ठाण्यात येणारी बुलेट ट्रेन ठाणे खाडीमार्गे कोपरखैरणे, महापे, शीळ, आगासन, म्हातार्डेमार्गे भिवंडीहून पालघर जिल्ह्यातून अहमदाबादला जाईल. या मार्गातील दगड, मातींचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन बुलेट ट्रेन प्रशासनाने आधीच केले आहे.>मेट्रोसह कॉरिडॉरचेही काममुंबई व ठाणे शहर परिसरांत निघणाºया माती व दगडांची विल्हेवाट लावणे तसे जिकिरीचे आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भिवंडीच्या नऊ हेक्टर जागेवर या मातीचा भराव होईल. याशिवाय, जेएनपीटीच्या जासई गावाजवळील मोकळ्या भूखंडावर या मातीचा भराव करण्याचे नियोजन आहे, असे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.पी. सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पासह मेट्रो आणि विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉर या प्रकल्पांचे काम आम्ही एकाच वेळी सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे एकमेकांच्या प्रकल्पांतून निघणारे दगड, मातीही महामार्गांचे रस्ते, रेल्वेची भरावकामे, कॉरिडॉर महामार्गासाठी वापरणार आहे. त्यासाठी एकाच वेळी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन