शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन जमीन खरेदीत कब्जेदार शेतकऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:14 IST

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही; प्रांताधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन 

नितिन पंडीत

भिवंडी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखले जाणारे बुलेट ट्रेन प्रकल्प भिवंडी तालुक्यातील भरोडी ,अंजुर ,सुरई ,कशेळी ,काल्हेर ,केवणी, खारबाव या भागातून जात असून त्यासाठी शासनाने बाजार भाव पेक्षा ही अधिक दर देत जमिनीचा मोबदला जाहीर केल्या नंतर या भागातील भूमाफिया जमीन दलाल यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून थेट जमीन मालक सावकारा सोबत खरेदी व्यवहार केल्याने मागील तीन पिढ्या शेतजमिनीत घाम गाळून शेत पिकवणाऱ्या कब्जेदार शेतकरी याची फसवणूक होत होरपळ सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण झाला आहे .

बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित जमिनींचे हस्तांतरण करतांना व खरेदी विक्री करतांना सात बारा सदरी नाव असलेल्या सावकार व मालकांचाच विचार केला जात आहे मात्र तीन पिढ्यांतून अधिक काळ शेती कसणाऱ्या व कब्ज्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र नाव नसल्याचे कारण देत जमीन मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने येथील बाधित कब्जेदार शेतकरी शासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाले आहेत . विशेष म्हणजे भिवंडीतील ग्रामीण भागात अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने पूर्वी पासून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या इतरांच्या नावे आहेत . विशेष म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे गट बुक उपलब्ध नसल्याने आपल्या जमिनी नेमकी कोणाच्या नावावर आहेत हे देखील येथील शेतकऱ्यांना माहित नसल्याने जमीन दलाल भूमी अभिलेख व जमीन मालक यांच्याशी संगनमत करून थेट जमिनी विकत आहेत . मात्र या विक्री प्रक्रियेपासून कब्जेदार शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत . त्यातच बुलेट ट्रेन साठी होणारा खरेदी व्यवहार कब्जेदार शेतकरी यांना अंधारात ठेवून होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना भरोडीचे मनोज भोईर यांनी केला आहे .

          बुलेट ट्रेनचे काम स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन न करता सुरू केले असून मौजे भरोडी येथील सर्व्हे क्रमांक १४९ व १३४  मधील भूसंपादन मिळकतीची थेट खरेदी न करता प्रकल्पाचे काम शेतजमिनीत सुरू आहे . कब्जा वहीवाटीच्या हरकती सुनावणी न घेताच थेट खरेदी केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून नुकताच शेतकरी संघटना भरोडी च्या शेतकरी शिष्टमंडळा सोबत उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नाळदकर यांच्या दालनात सोमवारी चर्चेसाठी आमंत्रित केले होते .या वेळी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांसह भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस व बाधित कब्जेदार व अन्याय झालेले शेतकरी उपस्थित होते. यावेळी एकही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन भिवंडी प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे . 

          या बैठकीं दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी भरोडी गावातील भूसंपादन संदर्भातील वाद मिटविण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवावी असे आदेश संबंधितांना देत बाधित शेतकऱ्यांनी एक ही खोटी केस सहन करायची नाही ,त्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे मोजायचे नसून भूमापक अधिकारी यांनी पारदर्शक काम करून दोन दिवसात शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर द्यावे ,कब्जेदार यांना विश्वासात घेतले नसल्यास अथवा कब्जेदार शेतकऱ्यांचे नाव इतर हक्कात असल्यास नक्कीच सहकार्य करू असे डॉ मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत कब्जेदार कुळ असल्यास कायदेशीर मदत करता येणे शक्य असून बुलेट ट्रेन यांना सावकारा सोबत नोंदणी करीत असताना ताबा घेताना कब्जे दार उभा राहिल्यास त्या मध्ये निराकरण होऊ शकते तसेच प्रकल्प थांबवता येत नाही परंतु शेतकऱ्यांच्या शंकांचे निराकरण होत राहील त्यासाठी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे . या शिष्टमंडळात मनोज भोईर, संदीप पाटील ,विजय पाटील, विनोद पाटील भरोडीकर ,कचरू कृष्णा पाटील ,वरूण पाटील यांसह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनFarmerशेतकरी