शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनला भारतातील विरोध चुकीचा - मिजोकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:49 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे.

ठाणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे. मात्र, त्या बुलेट ट्रेनला भारतातच होणारा विरोध चुकीचा आहे. बुलेट ट्रेनमुळे व्यापार वाढीस लागेल. दळणवळण अधिक सुखकर होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असे मत जपानच्या ओसाका विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रोफेसर डॉ. तोमिओ मिजोकामी यांनी व्यक्त केले.जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने जपान-भारत संबंध इतिहास आणि संदर्भ या विषयावर मिजोकामी यांचे व्याख्यान कात्यायन सभागृहात सोमवारी सायंकाळी पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. सध्या ते भारत दौºयावर असून यादरम्यान भारतातील विविध शैक्षणिक संस्था व विद्यापीठांना भेटी देऊन जपान-भारत संबंध या विषयावर हिंदी, जापनीज, बांगला आणि पंजाबी या चार भाषांमधून व्याख्याने देणार आहेत. त्यांच्या या उपक्र माचा शुभारंभ त्यांनी ठाण्यातून केला. भारत हा जपानसाठी आदर्श सांस्कृतिक देश आहे. या दोन्ही देशांचे अनेक काळापासून चांगले संबंध राहिलेले असून या दोन्ही देशांनी अनेक स्थित्यंतरेही पाहिलेली आहेत. तर, सध्याचे संबंध पाहता भविष्यात हे दोन्ही देश एका नव्या उंचीवर पोहोचतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बुलेट ट्रेनबद्दल बोलताना २०२३ नंतर त्याच बुलेट ट्रेनने मुंबई-अहमदाबाद असा प्रवास करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर अध्यक्षस्थानी होते. अनंत अडचणींवर मात करून प्रगती कशी करावी, हे जपानकडून शिकण्यासारखे आहे. जपानने आर्थिक, शैक्षणिक व तंत्रविज्ञान क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली आहे. भारताचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनIndiaभारत