शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात ६४० स्टॉलसह ४५ गाळ्यांवर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:30 IST

मागील काही दिवस मुंब्रा भागात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा वेग आता वाढला आहे.

ठाणे/मुंब्रा : मागील काही दिवस मुंब्रा भागात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा वेग आता वाढला आहे. मंगळवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानुसार सात पथकांनी तेथील गुलाब मार्केटसह जवळपास ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे बुलडोझरने जमीनदोस्त केले.मंगळवारी सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशन ते वाय जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूंनी ही कारवाई करण्यात आली. यासाठी सर्व उपायुक्तांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांचा समावेश असलेली सात विविध पथके तयार केली होती. या पथकांच्या साहाय्याने सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून कारवाईला सुरुवात झाली. यामध्ये संपूर्ण गुलाब मार्केट जमीनदोस्त करण्याबरोबरच रस्त्यांवरील एकूण ६४० स्टॉल्स बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर एमएम व्हॅली, अमृतनगर, बॉम्बे कॉलनी या परिसरातील कारवाईत ४५ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले.उपायुक्त (अतिक्र मण व निष्कासन) अशोक बुरपल्ले यांच्या समन्वयातून उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप, शंकर पाटोळे, महेश आहेर यांच्या पथकांनी ही कारवाई ८ जेसीबी, १० डंपर आणि जवळपास २०० कामगारांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.