शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार झाडांवर बुलेट ट्रेनकरिता कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:22 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत.

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्रातील ८३ हेक्टरहून अधिक वनक्षेत्र प्रकल्पाकरिता वापरले जाणार आहे, तर गुजरातमधील केवळ सहा हेक्टर वनक्षेत्र बाधित होत आहे. १८ हेक्टर जमिनीवरील कांदळवन या प्रकल्पामुळे नष्ट केले जाणार आहे.या प्रकल्पाच्या मार्गात नद्या, खाड्या आणि ३४ तळी असून त्यापैकी काहींचे मार्ग बदलण्यात येतील, तर काही बुजवण्यात येणार आहेत किंवा कसे ते स्पष्ट नाही. एवढे सारे होऊनही पर्यावरणावर या प्रकल्पाचा सुतराम परिणाम होणार नाही, असा दावा संबंधित अधिकारी करत आहेत.बुलेट ट्रेनचा मार्ग हा ५०८.१७ किमीचा असणार असून सध्या मुंबई-अहमदाबाद प्रवासाकरिता लागणाºया वेळेपेक्षा दोन तास कमी वेळात ही ट्रेन अंतर कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गातील सर्वात लांबीचा बोगदा ठाण्यात असणार आहे. तो पाण्याखाली ३० मीटर खोल असेल व त्याचे अंतर तब्बल २०.७१ किमी असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण २९ गावे बाधित होणार असल्याची माहिती पर्यावरण अहवालात नमूद केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे ड्रीम प्रोजेक्ट पाच वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. ठाणे खाडीत पाहुणे म्हणून येणाºया फ्लेमिंगोंचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा दावा पर्यावरणवादी करत असले, तरी या अहवालात मात्र या पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्ष्यांना बुलेट ट्रेनपासून धोका होऊ नये, यासाठी योजना आखण्यात आली आहे.प्रकल्पाकरिता २०७.७७ हेक्टर भूसंपादन केले जाणार असून त्यापैकी ८१.५१ हेक्टर खाजगी जमीन, देखरेख आगार १२६.२६ हेक्टर वनप्रदेश फेरफार १७.३६५८ हेक्टरचे असणार आहे. तर, यामध्ये वनक्षेत्र हे ८३.५५ हेक्टर एवढे असणार असून यामध्ये महाराष्टÑातील तब्बल ७७.४५ हेक्टरचा समावेश आहे. गुजरातमधील केवळ ६.१० हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश असणार आहे. ठाण्यातील वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने याठिकाणी फेरफार करावा लागणार आहे. परंतु, तो कसा केला जाणार, कुठे केला जाणार, याचा अहवालात उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रकल्पाच्या जमिनीतील माती सुपिक आहे, असेही नमूद केले आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन