शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इमारत दुर्घटना : भाजीविक्रेत्या महिलेने दाखवली माणुसकी; हातगाड्यांवर वाहिले लोकांचे सामान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:29 IST

कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

- अनिकेत घमंडी  डोंबिवली : कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.पहाटे पावणेतीन वाजता इमारत पडल्यानंतर घरांमधून जे सामान मिळेल ते तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी रहिवाशांची धावपळ सुरू होती. पण एवढ्या पहाटे टेम्पो, मोठी वाहने कशी मिळणार, या चिंतेने नागरिकांना ग्रासले होते. त्याची कल्पना येताच वृंदा वाट यांनी गुरुवारी व्यवसाय करायचा नाही, भाज्या ठेवण्यासाठी ज्या हातगाड्या होत्या, त्या नुकसानग्रस्तांच्या मदतकार्याला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.त्या म्हणाल्या की, एरव्ही माझ्याकडून वर्षानुवर्षे या नागरिकांनी भाजी नेली आहे, या सगळ्यांची मुले माझ्यासमोर मोठी झाली. संकटकाळात मदत करण्याची हीच ती संधी होती. रहिवासी पवन पाटील यांनी समस्या सांगितल्यावर मी दोन्ही हातगाड्या तेथे पाठवल्या. रस्त्यावर पडलेलं सामान युवकांनी ठेवले आणि मदतकार्याला वेग आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.एवढेच नव्हे, तर इमारत पडल्यानंतर तातडीने महिला, लहान मुलांना त्यांच्या रिकाम्या असलेल्या दोन घरांमध्ये सकाळपर्यंत थांबा असेही वृंदा यांनी सुचवले. ज्यांना कुठेही घर मिळत नसेल, त्यांनी आमच्या रिकाम्या घरात राहायला जावे, भाड्याचे नंतर बघू, नाही जमले तर दोन महिने भाडे देऊ नका, पण घाबरू नका असे सांगून त्यांनी रहिवाशांना दिलासा दिला. घराचे, सामानाचे नुकसान झाले, पण ते भरुन काढता येईल. संकटांना धैर्याने सामोरे जा, असे सांगून त्यांनी महिलांना धीर दिला. शुक्रवारी सकाळपर्यंत भाजीची गाडी त्यांनी मदतकार्याच्या ठिकाणी आणली होती. सर्व आटोपल्यावर व्यवसायाला सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी कुटुंबीयांना दिल्या होत्या.माजी नगरसेवक संजय पावशे यांनीही काही दुर्घटनाग्रस्त भाडेकरूंना राहण्यासाठी तत्काळ घर उपलब्ध करून दिलासा दिला. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळीच अग्निशमन दल, विष्णुनगर पोलीस आणि समाजसेवकांसह इतरांनी सामाजिक बांधीलकीतून मदतकार्यासाठी तातडीने धाव घेतली. संजय पावशे यांनी टेम्पो, रिक्षा उपलब्ध करून देत रहिवाशांना धीर दिला. 

ऐन सणासुदीच्या दिवसात इमारतीचा भाग कोसळल्याने रहिवाशांवर मोठे संकट कोसळले आहे. दिवाळी तोंडावर आली असताना त्यांचा हक्काचा निवारा हिरावला गेला आहे. त्यामुळे त्यांचे संकट खूप मोठे आहे. माणुसकीच्या नात्यातून मी करीत असलेली मदत त्यांच्या संकटापुढे काहीच नाही, असा भावना वृंदा वाट यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :dombivaliडोंबिवली