शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांना ग्रीन झोन मोकळे करण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:21 IST

ठाणे महापालिका हद्दीतील संजय गांधी उद्यानाच्या क्षेत्रासह वनक्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिका घेणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील संजय गांधी उद्यानाच्या क्षेत्रासह वनक्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिका घेणार आहे. तसा चर्चेच्या अनुषंगाने ठराव झाला असल्याचे सांगण्यात येत असले, तरी यामागे केवळ तेथील अतिक्रमणे हटवून शहरी भागात ग्रीन झोनमध्ये अ‍ॅफॉर्डेबल हाउसिंगची स्किम राबवून विकासकासाठी ते मोकळे करण्याचा सत्ताधाऱ्यांनी घाट रचल्याचा आरोप ठाणे शहर राष्टÑवादी काँग्रेसने केला.गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी, शानू पठाण आदींनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन कशा पद्धतीने बिल्डरांच्या हिताचे धोरण चोरीचोरी चुपकेचुपके आखत आहे, याचा पर्दाफाश केला. याबाबतचा पुरावाच त्यांनी यावेळी सादर केला. १९ मे २०१८ रोजी चर्चेच्या अनुषंगाने हा ठराव केल्याचा दावा सत्ताधाºयांनी केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानुसार, ठामपा हद्दीतील संजय गांधी उद्यानाच्या क्षेत्रात तसेच वनक्षेत्रात अतिक्रमण असलेल्या घरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही ठाणे महापालिका घेत आहे.>घरे मिळवण्यासाठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट मोजावी लागणारवास्तविक पाहता मागील कित्येक वर्षे वनविभागाच्या जागेवर हे रहिवासी राहत आहेत. परंतु, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या नावावर विकासकाला अ‍ॅफॉर्डेबल हाउसिंगची स्किम राबवून ग्रीन झोन मोकळा करून देण्याचा घाट या माध्यमातून घातला जात आहे. या रहिवाशांना पुन्हा आपली घरे मिळवण्यासाठी कन्स्ट्रक्शन्स कॉस्ट मोजावी लागेल. परंतु, विकासकाला ग्रीन झोन मोकळा करून देण्यासह एफएसआयसुद्धा मोफत मिळणार आहे. याचाच अर्थ बिल्डरांच्या हितासाठीच हा छुपा ठराव केला असून याविरोधात आवाज उठवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.