शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वृद्धेच्या फ्लॅटवर टाळे तोडून बिल्डरने केला बेकायदेशीर कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:45 IST

ठाण्यातील कारवालोनगर येथील एका वृद्धेच्या फ्लॅटवर बिल्डरने बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धेचा मुलगा हेरॉल्ड कारवालो यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध तक्र ार दाखल केली आहे.

ठळक मुद्देकरवालोनगर येथील घटनाठार मारण्याचीही दिली धमकीपोलिसांनी दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जागेच्या मोबदल्यात वयोवृध्द जागा मालकिणीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅटवर बिल्डरने बेकायदेशीररित्या टाळे तोडून कब्जा केल्याची घटना ठाण्यातील करवालोनगर भागात घडली आहे. याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धेचा मुलगा हेरॉल्ड करवालो यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध तक्र ार दाखल केली आहे. पोलिसांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने बुधवारी याप्रकरणी त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली आहे.कारवालोनगर येथील एका भूखंडावर असलेली जुनी चाळ तोेडून त्याठिकाणी प्राची व प्रतीक्षा कन्स्ट्रक्शनचे मालक रवी आणि प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये सात मजली इमारत बांधली. त्यावेळी जमिन मालक म्हणून सिल्वीनीया कारवालो यांना त्यांनी १८ मे २०१० रोजी दोन फ्लॅट दिले. तशी रितसर नोटरीही करण्यात आली. त्यातील एका फ्लॅटची त्यांनी विक्री केली. तर दुसरा फ्लॅट कारवालो यांनी भाडयाने दिला होता. गेल्या दहा वर्षांत पाच भाडेकरू करवालो यांनी ठेवले. अखेरच्या भाडेकरूने २५ जून २०२० रोजी रितसर करार संपल्याने फ्लॅट रिकामा केला. त्यानंतर कारवालो यांनी आपले टाळे लावून फ्लॅट बंद करून ठेवला. दुसऱ्याच दिवशी दिवशी कारवालो यांच्याकडील कर्मचारी साफसफाईसाठी या फ्लॅटवर गेला तेंव्हा तिथे फ्लॅटचे टाळे तोडून बिल्डर प्रभाकर सावंत यांनी पत्नी आणि दोन मुलींसह जबरदस्तीने तिथे वास्तव्याला आल्याचे आढळले. हा प्रकार समजताच सिल्वीनीया यांचा मुलगा हेरॉल्ड यांनी त्यांना विचारणा केली असता, हा माझा फ्लॅट आहे, मी फ्लॅटचे टाळे तोडून माझा कब्जा केला आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी अरेरावीची उत्तरे त्यांना देण्यात आली.अखेर हेरॉल्ड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ जून रोजी धाव घेऊन सावंत यांच्याविरुद्ध कलम ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या सावंत या बिल्डरने यापूर्वीही आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली असून याबाबत आपण अल्पसंख्याक आयोगाकडे तक्र ारही केली आहे, असे हेरॉल्ड कारवालो यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. पोलिसांनी मात्र आता या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने दाद तरी कुठे मागायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बिल्डर प्रभाकर सावंत यांच्याशी वारंवार संपर्क साधून ते प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी