शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

दिव्यात टीएमटीचे टर्मिनल बांधा, स्वमालकीच्या ५० बस खरेदीचीही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:05 IST

ठाणे परिवहनच्या सादर झालेल्या मूळ अंदाजपत्रकारवर सोमवारी परिवहन समितीची विशेष सभा सोमवारी घेण्यात आली. या सभेत कामगारांची थकबाकी, राखीव भुखंड, ठाणेकरांना चांगली सेवा देण्यासह दिवा टर्मिनल बांधण्यासह नव्याने स्वत:च्या मालकीच्या ५० बस खरेदीसाठी तरतूद करण्याच्या मुद्यांवर चर्चा झाली.

ठाणे : ठाणे परिवहनच्या सादर झालेल्या मूळ अंदाजपत्रकारवर सोमवारी परिवहन समितीची विशेष सभा सोमवारी घेण्यात आली. या सभेत कामगारांची थकबाकी, राखीव भुखंड, ठाणेकरांना चांगली सेवा देण्यासह दिवा टर्मिनल बांधण्यासह नव्याने स्वत:च्या मालकीच्या ५० बस खरेदीसाठी तरतूद करण्याच्या मुद्यांवर चर्चा झाली.ठाणे परिवहन सेवेचा २०१८-१९ च्या मुळ अंदाजपत्रकाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत परिवहन समिती सदस्यांनी उत्पन्न वाढीबाबात साधक बाधक चर्चा करून काही महत्त्वाच्या सुचना केल्या. परिवहनकडे सध्या १७ आरिक्षत भूखंड पडून आहेत. त्यातील दिवा येथील भूखंडावर टर्मिनल उभारण्यात यावे, अशी सूचना परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनी केली. त्यामुळे झपाट्याने विकसित होणाºया दिव्यातून पनवेल, मुंब्रा, डोंबिवली अशी सेवा देऊन प्रशासनाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर कामगारांची थकबाकी देण्यासाठी प्रशासनाकडे अतिरिक्त ३५ कोटींची मागणी परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी केली. टीएमटीच्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीतील बस येत असतानाच परिवहनच्या मालकीच्याही ५० बस घेण्यासाठी तरतूद करावी, त्यातून उत्पन्नात निश्चितच भर पडेल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. तर सदस्यांच्या या सूचना परिवहनची आर्थिक बाजू सावरण्यासाठी होत्या. त्या अर्थसंकल्पीय भाषणात मांडल्या जातील, असे सभापती अनिल भोर यांनी स्पष्ट केले. यावर्षी प्रवाशी भाड्यापोटी १३९ कोटी २२ लाखांचे उत्पन्न लक्ष्य ठेवले असले तरी मुळात सोमवारीही आपल्या आगरातून कमी बसेस बाहेर पडत असल्याचा मुद्दा प्रकाश पायरे यांनी उपस्थित केला. आजच कळवा आगरातून ४० पैकी २७, मुल्लाबाग येथून ३० पैकी २४ आणि वागळे येथून १०० पैकी ७० बस बाहेर पडल्या आहेत. याचा अर्थ आजही आपल्या ५० बसेस बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे उत्पन्नाचे लक्ष्य कसे साध्य होणार असा सवालही त्यांनी केला. मागील वर्षीही १२६ कोटी उत्पन्नाचे लक्ष्य आपण ठेवले होते. प्रत्यक्षात ९५ कोटींचेच उत्पन्न मिळाले म्हणजे ३० टक्के उत्पन्न कमी मिळाल्याचे सांगून परिवहनचे वास्तव मांडले. सचिन शिंदे यांनीही उत्पन्न वाढावे यासाठी एक तिकीट योजना सुरू करावी, अशी मागणी केली.पोलिसांनी थकविले परिवहन सेवेचे २३ कोटी रुपये-ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाºया पोलीस कर्मचाºयांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडून मिळणारे ४.८१ कोटी अनुदान परिवहन सेवेस प्राप्त झाले असले तरी अद्यापही गृह खात्याकडून २२ कोटी ८८ लाखांची थकबाकी येणे असल्याची माहिती उघड झाली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या अंदाजपत्रकात ही बाब समोर आली आहे. ठाणे परिवहन सेवेत आजघडीला ३१३ बस असून त्यातील १८० च्या आसपास रस्त्यावर धावत आहेत. परिवहनचे प्रवासी इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच खाजगी बसने पळविले असले तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या आसपास गेले आहे. परंतु, दुसरीकडे परिवहनला विविध घटकांकडून मिळणाºया उत्पन्नापैकी ठाणे पोलिसांच्या थकबाकीचादेखील समावेश होतो. पोलिसांच्या प्रवास खर्चापोटी पोलीस ग्रॅन्ट परिवहन सेवेकडे प्राप्त होत असते. २०१०-११ ते २०१७-१८ या कालावधीत ती २२ कोटी ८८ लाख एवढी असून अद्यापही मिळाली नसल्याची माहिती परिवहनने आपल्या अंदाजपत्रकात नमूद केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मिळावी म्हणून परिवहन सेवेने गृह खात्याकडे वारंवांर पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु मार्च २०१६ पर्यंत या रकमेपैकी ५ कोटी ८१ लाख व २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३८ लाख परिवहन सेवेकडे प्राप्त होतील, असे अपेक्षित धरण्यात आले होते. त्यानंतर यंदा सादर झालेल्या परिवहनच्या मूळ अंदाज पत्रकात मार्च १९ पर्यंत या शिल्लक रकमेपैकी ३ वर्षांचे ४ कोटी १३ लाख परिवहनला प्राप्त होतील, असा अंदाज बांधला आहे. यातील किती रक्कम परिवहनला प्राप्त झाली याचा उल्लेख झालेला नाही. मागील वर्षी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडून मिळणारे ४.८१ कोटी पोलीस अनुदान परिवहन सेवेस प्राप्त झाले आहे. परंतु, आता तर २२ कोटी ८८ लाखांची देणी अद्यापही शिल्लक असून ती वसूल करण्यासाठी परिवहनला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे