शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वीजबिलामुळे बीएसएनएलची सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 18:12 IST

बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे.

बदलापूर : बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे. त्याचा परिणाम शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील अंदाजे चार हजार ग्राहकांसह, पोस्ट, बँका, मालमत्ता नोंदणी ही शासकीय कार्यालये आणि मोबाईल धारकांवर झाला आहे.  दूरध्वनी आणि इंटरनेटची सेवा पुरवताना सातत्याने बीएसएनएलबाबत नेहमीच ग्राहकांची ओरड असते. बदलापूर येथील बीएसएनएलची सेवा बुधवारी ठप्प झाली. बीएसएनएलचा विद्युत पुरवठाच बुधवारी बदलापूरच्या महावितरण अधिकाऱ्यांनी खंडित केला होता. बीएसएनएलने डिसेंबर २०१८ या महिन्यातील पाच लाख १७ हजार रुपयांचे विद्युत बिल वेळेवर न भरल्याने महावितरणने बुधवारी बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे परिणामी बदलापूर शहरातील पूर्व भागातील अडीच हजार आणि पश्चिम भागातील ७०० ग्राहकांचे दूरध्वनी, मोबाईल आणि इंटरनेट सेवा यामुळे ठप्प झाली होती.तसेच बीएसएनएलकडून सर्व शासकीय कार्यालयात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा दिली जाते. त्यामुळे बुधवारी पोस्ट, महत्त्वाच्या बँका, मालमत्ता नोंदणीचे कार्यालय या सर्व शासकीय कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला होता. तर विद्युत पुरवठ्याअभावी बुधवारी दिवसभर बीएसएनएलला जेनरेटरचा आधार घेत आपला कारभार हाकण्याची वेळ आली होती. तर याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, बीएसएनएलने विद्युत बिलाचा भरणा केल्यास तात्काळ त्यांचा विद्युत पुरवठा सुरू केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल