शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यावरील पूल रखडला

By admin | Updated: January 30, 2017 01:56 IST

अंबरनाथ पालिकेच्या बहुचर्चित फातिमा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या बहुचर्चित फातिमा रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. या पुलाचे काम सुरू झाले असून वीजवाहिन्यांचे स्थलांतर न झाल्याने या कामात अडचणी येत आहे. या वाहिन्यांच्या स्थलांतरणाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी पालिकेने करूनही ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे. अंबरनाथ पोलीस ठाणे ते फातिमा शाळेपर्यंतच्या ३ कोटी ५० लाखांच्या काँक्रिट रस्त्याचे आणि त्याअंतर्गत असलेल्या मुख्य नाल्यावरील पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, नाल्यावरील पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. एक महिना होऊनही हे काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराने या कामादरम्यान पुलाखालून जाणाऱ्या जल आणि वीजवाहिन्या स्थलांतरित करून त्या पुलाच्या कोपऱ्यावरून टाकण्यासाठी पाठपुरावा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपली जलवाहिनी स्थलांतरित केली. मात्र, महावितरण विभागाची भुयारी वीजवाहिनी अद्याप स्थलांतरित झालेली नाही.वीजवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी येणारा खर्चदेखील भरलेला आहे. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारामार्फत सतत पाठपुरावा करूनही ते काम करण्यास महावितरण चालढकल करत आहे. खर्च दिल्यावर तरी किमान काम लवकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते काम होत नसल्याने पालिका प्रशासन महावितरणपुढे हतबल झाले आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्याची तयारी पालिका प्रशासन करत आहे. मुदतीत वीजवाहिन्या न हलवल्यास त्या निकामी करून पालिका प्रशासन पुलाचे काम करणार आहे. कोहोजगावाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने तो रस्ता जास्त काळ बंद ठेवणे वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे नाही. कंत्राटदाराने हे काम लवकरात लवकर करून देण्याची हमी दिली असली, तरी आता वीजवाहिन्यांच्या स्थलांतरणाअभावी हे काम संथगतीने सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत स्थलांतरणाचे काम न झाल्यास हे काम बंद करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी महावितरणला अंतिम मुदतीचे पत्र देणार आहे. २७ डिसेंबरला या पुलाच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आला. या वाहिन्या सोडून इतर कामांना सुरुवात करण्यात आली. वाहिन्या हलवण्याचे काम झाल्यावर तत्काळ काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे. तसेच या वाहिन्या हलवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता पालिका घेत आहे. सहकार्याची भूमिका घेऊनही महावितरण विभाग हे काम करत नाही. ज्या पद्धतीने या वाहिन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न आहे, तसाच प्रश्न खांब स्थलांतर करण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण केलेले असले तरी खांब अद्याप स्थलांतरित झालेले नाही. याच रस्त्यावर नाना पाटील प्राइड कॉम्प्लेक्ससमोरील ट्रान्सफॉर्मर अद्याप स्थलांतरित न झाल्याने या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढलेली आहे. (प्रतिनिधी)