शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण खाडीवरील पुलाची डेडलाइन हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:23 IST

कल्याण-भिवंडी मार्गावर कल्याण खाडीवरील दुर्गाडी सहापदरी पुलाचे काम मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते लांबले आहे.

कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावर कल्याण खाडीवरील दुर्गाडी सहापदरी पुलाचे काम मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते लांबले आहे. त्यामुळे हा पूल आता मे २०१९ मध्ये पूर्ण होईल, असे एमएमआरडीएने कळवले आहे. पुलाची डेडलाइन वाढल्याने आणखी वर्षभर वाहनचालक व प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.कल्याण खाडीवरील सहापदरी नव्या पुलाचे काम सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, त्यापूर्वीच मार्च २०१६ मध्ये कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला. हे काम १० मार्च २०१८ पर्यंत २४ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, ही मुदत उलटली, तरी काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी फडणवीस आणि एमएमआरडीएकडे करण्यात आलेल्या होत्या. शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी तक्रारीत कामाच्या दिरंगाईची कारणे विचारली होती. हा पूल उभारणाऱ्या कंत्राटदाराकडून अन्य पुलांच्या कामातही अशा प्रकारची चालढकल सुरू आहे. त्यामुळे त्याच्याकडून एकतर वेळेत काम पूर्ण करून घ्यावे, अथवा काम रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा, अशी मागणी पाटील यांनी केली होती. एमएमआरडीएने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, कार्यादेश दिल्यावर कंत्राटदाराने प्राथमिक सर्वेक्षण, पुलाचे संकल्पचित्र आदी तयार केले. त्यानुसार, त्याला मंजुरी दिली. परंतु, पावसाळ्यात काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे चार महिन्यांनंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने नेव्हिगेशन स्पॅनच्या दोन स्पॅनच्या लांबीमध्ये व उंचीत वाढ करण्याचे सुधारित आदेश दिले. त्यानुसार, खाडीच्या मध्यभागी टाकण्यात येणाºया गाळ्यांची रचना बदलावी लागली. या नव्या रचनेस १२ जून २०१७ ला मंजुरी दिली गेली. पुलाच्या संकल्पनेत व उभारणीच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागला. त्यात बराच कालावधी गेला. नियोजन व आखणी नव्याने करावी लागली.