शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणातील अधिकारी झाले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:33 IST

पालिकेतील जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले, त्यांना वर्ष-दोन वर्षांनंतर सेवेत घेतले गेले. मात्र, त्यांना कामाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले.

- पंकज पाटीलअंबरनाथ आणि बदलापुरात लाच प्रकरणात जे कोणी अधिकारी अडकले, ते पुन्हा पालिकेत फिरकलेच नाही. त्यांची परस्पर बदली करण्यात आली. पालिकेतील जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले, त्यांना वर्ष-दोन वर्षांनंतर सेवेत घेतले गेले. मात्र, त्यांना कामाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत सर्वात मोठा सापळा रचला गेला, तो मुख्याधिकारी राजेश कानडे असताना. राजेश कानडे हे पूर्वी अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी होते. त्यांची बदली करून त्यांना बदलापूरला पाठविण्यात आले. मात्र, काही बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांचे पटत नसल्याने त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचले गेले. त्यांचे निकटचे सहकारी दिनेश नेरकर हे नगररचना सहायकपदावर काम करीत होते. नेरकर यांनी एका प्रकरणात लाच स्वीकारून थेट मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले होते. त्यामुळे सापळ्यात मुख्याधिकारी कानडे आणि त्यांचे सहकारी नेरकर हे दोघे अडकले. याप्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना कानडे यांनी पुन्हा पालिकेत न फिरकण्याचा निर्णय घेतला. तर, नेरकर हे परजिल्ह्यात बदली करून निघून गेले. असाच प्रकार अंबरनाथमध्येदेखील घडला. पालिकेचे उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांची चौकशी झाल्यावर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नार्वेकर यांची शासनाने परजिल्ह्यातील नगर परिषदेत बदली केली. असाच एक प्रकार अंबरनाथच्या नगररचना विभागातही घडला. सहायक नगररचनाकार चव्हाण यांच्याविरोधात लाच प्रकरणात सापळा रचण्यात आला होता. मात्र, चव्हाण हे लाचलुचपत विभागाच्या हातावर तुरी देऊन तेथून पळून गेले. ते अधिकाºयांच्या हातात न सापडल्याने त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या. या प्रकरणानंतरही चव्हाण पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू होण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, राज्य शासनाने त्यांची दुसºया नगर परिषदेत बदली केली.अधिकाºयांसह जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले आहेत, ते देखील मूळ प्रवाहाच्या बाहेरच राहिले आहेत. त्यांना पालिकेच्या मूळ आणि जबाबदारीच्या पदापासून दूर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग