शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दागिन्यांद्वारे कर्ज घेऊन १० लाख ५० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:42 IST

ठाण्यातील पतसंस्थेने दोन : सोनारांसह कर्जदाराविरुद्ध केला गुन्हा दाखल

ठाणे : बनावट दागिन्यांच्या आधारे सात लाख ६० हजारांचे सोने तारण कर्ज काढून १० लाख ५० हजारांची परतफेड न करणाऱ्या कौशल मिश्रा (रा. सुभाषनगर, ठाणे) याच्यासह तिघांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुभाषनगर येथील रहिवासी असलेल्या मिश्रा याने ३ जुलै २०१५ ते २७ जुलै २०१९ या कालावधीमध्ये ठाण्यातील जे कबुरचंद ज्वेलर्सचे सुरेश गुंगलिया आणि त्यांचा मुलगा हार्दिक गुंगलिया (रा. विठ्ठल मंदिर ट्रस्ट बिल्डिंग, ठाणे) यांच्याशी संगनमत करून एक ग्रॅम फार्मिंगचे दागिने ठाण्यातील महात्मा फुले को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचे विजय कांबळे यांच्याकडे कर्जासाठी गहाण ठेवले. ते गहाण ठेवताना त्यांनी सोने परीक्षणाचे खोटे प्रमाणपत्र देऊन या संस्थेकडून सात लाख ६० हजारांचे सोनेतारण कर्जही ३ जुलै २०१५ रोजी घेतले.कर्जाची परतफेड न करता कर्जाची मुद्दल, कर्जावरील व्याज, दंड आणि इतर खर्च असे १० लाख ५० हजारांची रक्कम परतफेड न करता फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या पतसंस्थेचे कांबळे यांनी कर्जदार कौशल मिश्रा तसेच सुरेश गुंगलिया आणि हार्दिक गुंगलिया अशा तिघांविरुद्ध २७ जुलै २०१९ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कसून चौकशी करत असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी