शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केळवेतील झांझरोळी धरणाला भगदाड; आठ गावांत पसरले भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 05:42 IST

गेल्या चाळीस वर्षांपासून १७ गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात काही प्रमाणात गळती झाल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कळवले होते, मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसफाळे : पालघर तालुक्यातील केळवा रोड भागातील झांझरोळी धरणाच्या बाहेरील बाजूस पाणी सोडण्याच्या दिशेने शनिवारी सकाळी १० च्या सुमारास भगदाड पडले. त्यामुळे येथील आठ गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणातील पाणी कमी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. 

गेल्या चाळीस वर्षांपासून १७ गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात काही प्रमाणात गळती झाल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कळवले होते, मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने बंधाऱ्याला भगदाड पडल्याचे ग्रामस्थ प्रकाश सावर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान,  धरणाला गळतीची सुरुवात झाल्याने पाणबुड्यांच्या साहाय्याने ताडपत्री लावली होती, मात्र गळती सुरूच राहिल्याने भगदाड पडले. त्यामुळे धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. या धरणाच्या आतील भागात मातीने भराव टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी घटनास्थळी धाव घेत  पाणीसाठ्यातील  परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्रांत अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार सुनील शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलील दल तैनात केले होते.  प्रकाश सावर, योगेश पाटील व  राजेश म्हात्रे हे जेसीबीसह डंपर घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

सतर्कतेचा इशारादातीवरे, खार्डी, मथाने, एडवण, कोरे, भादवे, चटाळे, नगावे, विळंगी केळवे, माहीम, दांडा, माकुणसार, आगरवाडी,  उसरणी, केळवे रोड या १७ गावांना पाणीपुरवठा या बंदरातून होत होता. देवीचापाडा, साईपूजा, गॅलेक्सी, पठारीपाडा, गोदरेपाडा, झांझरोळी, देवशेतपाडा, मंडळपाडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता हिलाल सुखदेव खलाणे यांनी दिली.