शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळग्रस्तांचे स्टॉल हटविणारे हात तोडू!

By admin | Updated: May 4, 2016 00:49 IST

गावदेवी मैदानातील दुष्काळग्रस्तांना गेल्या चार दिवसांपासून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टॉल हटविण्याच्या धमक्या दिल्याने, मंडप काढण्याचा दम

ठाणे : गावदेवी मैदानातील दुष्काळग्रस्तांना गेल्या चार दिवसांपासून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्टॉल हटविण्याच्या धमक्या दिल्याने, मंडप काढण्याचा दम दिल्याने, वीज जोडणी घेतल्यास कारवाई करू असा इशारा दिल्याने अखेर शिवसेना, मनसेने तातडीने धाव घेत दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला. स्टॉल हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात तोडू, असा सणसणीत इशाराच मनसेच्या नेत्यांनी दिला; तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याने महापौर संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेनेचे नेते यांनी तातडीने धाव घेत दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले. दुष्काळग्रस्तांना येथे राहण्यासाठी हवी ती मदत देऊ, परवानग्या देऊ, असे आश्वासन खुद्द महापौरांनीच दिले. ‘दुष्काळग्रस्तांच्या पोटावर नेत्यांचा पाय,’ अशा शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये मंगळवारी बातमी प्रसिद्ध होताच ठाण्यातील जागरूक नागरिकांनी सकाळी सकाळी दुष्काळग्रस्तांना ‘लोकमत’चे अंक नेऊन दिले आणि सुजाण ठाणेकर तुमच्या पाठीशी उभे राहतील, असा आत्मविश्वास दिला. त्यानंतरही लोकमत काय आहे, याचा अंदाज न आलेल्या भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने सकाळी थेट त्यांच्या स्टॉलवर येऊन ते स्टॉल हटविण्याच्या धमक्या तर दिल्याच, परंतु पालिकेच्या अतिक्रमण विभागाला सांगून हा स्टॉल हटविला जाईल, असा दम देखील दिला. स्टॉलला असलेली वीज जोडणी मंडपवाल्याला सांगून जबरदस्तीने बंद करण्यात आली. पुन्ही वीज दिल्यास तुझ्यावर केस करु, अशी धमकीही मंडपवाल्याला दिली. यामुळे आधीच परिस्थितीने गांजलेले, घाबरलेले हे दुष्काळग्रस्त हादरुन गेले. परंतु शिवसेना, मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.भाजप कार्यकर्त्यांकडून दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या त्रासाचे वर्णन आणि त्यांच्या नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका ‘लोकमत’ने मांडल्यावर शिवसेना, मनसेच्या नेत्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. या दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते गावदेवी मैदानात दाखल झाले. युवा सेनेचे कार्यकर्तेही घटनास्थळी तत्काळ धावून आले. महापौर संजय मोरे, शहराध्यक्ष हेमंत पवार, विभागप्रमुख प्रकाश पायरे, युवासेनेचे नितीन लांडगे, किरण जाधव, अर्जुन डाभी, तसेच मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते तेथे पोचले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी दुष्काळग्रस्तांना होत असलेल्या त्रासाची माहिती महापौराना दिली. ती ऐकताच, तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल आणि कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन महापौर मोरे यांनी दिले. एवढेच नव्हे, तर दम देऊन बंद पाडलेले स्टॉल सुरू करायला दोन्ही पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील महिलांनी तयार केलेले थालीपीठ विकत घेऊन खाल्ले. दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलमध्ये कायदेशीर परवानगीचाच मुद्दा असेल तर ती देण्यासाठी खुद्द महापौरांनी त्यासाठीचा अर्ज मागवून घेतला आणि पालिकेकडून या स्टॉलना लागणारी रितसर परवानगी दिली जाईल, असे सांगितले. कायदेशीर कार्यवाही तत्त्काळ पूर्ण करण्याचे आदेशही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दुष्काळग्रस्तांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी आलेले पालिकेचे अधिकारीही तेथे उपस्थित होते. त्यांनी जेव्हा दुष्काळग्रस्तांचा जगण्याचा संघर्ष पाहिला, तेव्हा तेही हेलावून गेले. नगरसेविकेच्या पतीने सकाळी बंद केलेली वीज जोडणी तात्पुरती चालू करुन देण्यात आली. मनसेचे अविनाश जाधव यांनी स्वत: स्टूलवर उभे राहून तेथे बल्ब लावला आणि प्रतिकात्मकरित्या त्यांच्या आयुष्यात प्रकाश फुलविला. (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्तांना सहकार्यच : महापौर ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांना आम्ही स्टॉलबाबत कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या दुष्काळग्रस्तांचा स्टॉल ना रस्त्यावर आहे ना फुटपाथवर. तो मैदानाच्या कम्पाऊण्डमध्ये असल्याने त्याचा त्रास कोणालाही नाही. मैदान ज्या महोत्सवाला देण्यात आले आहे. त्यांनाही या स्टॉलमुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही. हे दुष्काळग्रस्त कोणाकडून दयेची याचना करीत नाहीत. ते स्वाभिमानाने जगत आहेत. कष्ट करुन पोट भरत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वांनीच सहकार्य केलेच पाहिजे. त्यांना पालिकेकडून कायदेशीर परवानगी दिली जाईल. तात्पुरत्या वीजजोडणीची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यांना जी मदत लागेल ती सर्व केली जाईल. जोपर्यंत ते इथे आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांना कोणताही त्रास होऊन देणार नाही. - संजय मोरे, महापौर, ठाणे‘लोकमत’चे आभार! जगण्याचा संघर्ष करणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या त्रासाला ‘लोकमत’ने वाचा फोडली आणि हा प्रश्न ठाणेकरांपुढे मांडल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आम्ही आभारी आहोत, अशा शब्दांत शिवसेनेच्या वेगवेगळ््या नेत्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. ‘लोकमत’ वेळोवेळी आमच्या अडचणींसाठी धावून आला. आजही त्यांनी केलेले सहकार्य आमच्यासाठी मोलाचे आहे, अशा शब्दांत कमलताई परदेशी यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. गावदेवीतील वडापावच्या गाड्या कशा चालतात? दुष्काळग्रस्तांना हुसकावण्याचा प्रयत्न करणे हे अयोग्यच आहे. आम्ही त्यांच्या बाजुने उभे राहणार आहोत. नव्हे, प्रत्येकानेच त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. गावदेवी मैदानाच्या आजूबाजूला वडापावच्या गाड्या लागल्या आहेत. तेथेही स्टोव्ह, गॅस असतात. त्यांना आशीर्वाद देणाऱ्यांना तिथे कधी आग लागण्याचा धोका जाणवला नाही का? तेथे हे प्रश्न निर्माण होत नाहीत का? अशा वेळी फक्त दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलवरील स्टोव्ह, गॅसमुळेच कशी आग लागेल? - प्रकाश पायरे, विभागप्रमुख, शिवसेना‘आम्ही गरीबांच्या पाठीशी उभे’शिवसेना निश्चितपणे दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभी राहणार. भाजपाने जे मुद्द्े उपस्थित केले, ते योग्य नाहीत. यांना गोरगरिबांकडे लक्ष देता येत नाहीत का?- हेमंत पवार, शहरप्रमुख, शिवसेना केळकरांनी भूमिका मांडावी एकीकडे पक्षाच्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करायचा आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे सोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करायचा? त्यांनी तसे करु नये. या प्रकरणात आमदार संजय केळकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मनसे सुरूवातीपासूनच दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे आणि कायमच राहील. - अभिजीत पानसे, ठाणे शहर संपर्कप्रमुख, मनसेहात लावण्याचा प्रयत्न केला, तर...आम्ही दुष्काळग्रस्तांना नक्कीच पाठिंबा देऊ. एकीकडे मुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार, नगरसेवक त्यांना हुसकविण्याचा प्रयत्न करतात. अशी दुटप्पी भूमिका भाजपाने घेऊ नये. दुष्काळग्रस्तांच्या स्टॉलला हात लावण्याचा प्रयत्न कोणी केला, तर आम्ही त्यांचा हात काढल्याशिवाय राहणार नाही. - अविनाश जाधव, शहराध्यक्ष, मनसे